शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

आणखी २०० दहशतवादी देशात घुसखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 06:15 IST

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानी हद्दीतून सुमारे २०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या  तयारीत असून, त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दले सज्ज आहेत. या घुसखोरीला पाकिस्तानी लष्कर  व आयएसआय या गुप्तहेर  संघटनेची सक्रिय मदत असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथे चकमकीत मारल्या गेलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी त्याआधी या संघटनेच्या पाकिस्तानातील शक्करगढ छावणीपासून रात्रीच्या अंधारात ३० किमी चालत सांबा सीमाक्षेत्रातून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर ते जटवाल येथून श्रीनगरला जाणाऱ्या ट्रकमध्ये बसले असे तपासातून निष्पन्न झाले आहे. (वृत्तसंस्था)

कासिम हाच हल्ल्याचा मुख्य सूत्रधार चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकरवी भारतात घातपाती कारवाया घडविण्याचे कारस्थान जैश-ए-मोहम्मदचा कमांडर कासिम जान याने आखले होते. २०१६ साली पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्याचा कासिम हाच सूत्रधार होता. तो दहशतवादी नेता मुफ्ती रौफ असगर याच्या इशाऱ्यारून  काम करतो.

असा लागला छडानगरोटा येथे १९ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या चार दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व जीपीएस उपकरणे, वायरलेस सेट जप्त करण्यात आले होते. त्यातील माहितीची भारतीय गुप्तचर यंत्रणांनी छाननी केली. या दहशतवाद्यांनी पाकमधून कोणत्या मार्गाने भारतात घुसखोरी केली याचा छडा त्या माहितीवरून लागला आहे. 

सांबातील बोगद्याचा घुसखोरीसाठी वापर?

जम्मू-काश्मीरमधील सांबा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत एक बोगदा आढळून आला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी पाकमधून भारतात घुसखोरी करण्यासाठी याच बोगद्याचा वापर केला असावा असा सुरक्षा यंत्रणांचा कयास आहे. सीमेलगत असे आणखी काही बोगदे आहेत का या सुरक्षा जवान आता कसून शोध घेत आहेत.

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान