शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या प्रचार सभेत व्यासपीठावरून अकाली दल जिंदाबादच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 05:37 IST

काँग्रेसच्या पतियाळातील प्रचार सभेत व्यासपीठावरूनच अचानक अकाली दल जिंदाबादच्या घोषणा सुरू होताच श्रोते व काँग्रेस कार्यकर्ते गोंधळून गेले. काँग्रेसच्या उमेदवार व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परणीत कौर येथील उमेदवार आहेत.

- बलवंत तक्षकचंदीगड : काँग्रेसच्या पतियाळातील प्रचार सभेत व्यासपीठावरूनच अचानक अकाली दल जिंदाबादच्या घोषणा सुरू होताच श्रोते व काँग्रेस कार्यकर्ते गोंधळून गेले. काँग्रेसच्या उमेदवार व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परणीत कौर येथील उमेदवार आहेत. त्यांनाही हे काय चालले आहे कळेना. या घोषणा देत होते हरमित सिंह पठाणमाजरा.त्यांनी या घोषणा चुकून दिल्या. त्याबद्दल त्यांनी सर्र्वाची माफीही मागितली, पण त्यांनी या घोषणा सवयीने दिल्या होत्या. तसे ते स्वत:च म्हणाले. पठानमाजरा आतापर्यंत अकाली दलातच होते. ते १६ एप्रिल रोजी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांनी अकाली दल झिंदाबादच्या घोषणा देताच, संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्नही केला. नंतर पठानमाजरा म्हणाले की, मला माफ करा, अनेक वर्षे अकाली दलात होतो. त्यामुळे माझ्याकडून ही चूक झाली. त्यानंतर त्यांनी परणित कौर झिंदाबाद व काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.सवाल विचारणाऱ्या युवकाच्या कानशिलातसंगरुरमध्ये काँग्रेसच्या सभेत माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांना पाच वर्षांत तुम्ही काय केले, असे कुलदीप नावाच्या युवकाने विचारले. सभा सुरू असताना सर्वांनी त्याला सभेनंतर विचार असे सांगितले होते. पण सभा संपताच भट्टल तेथून निघू लागल्या, तेव्हा पुन्हा त्यांच्यापाशी जाऊ न त्याने तोच प्रश्न केला. त्यामुळे संतापून त्यांनी कानशिलात वाजवली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamritsar-pcअमृतसर