शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Anna Hazare Hunger Strike : अण्णांचे उपोषण सुरुच, प्रकृतीबाबत चिंता, कोअर कमिटीची तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 11:35 IST

अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची रणनिती ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण आजच्या दिवशीही सुरुच आहे. अण्णांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले असून त्यांना भरपूर पाणी पिण्याचा तसेच आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची रणनिती ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी केवळ महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कागद घेऊन येतात. केंद्र सरकारकडून ठोस आश्वासने नाहीत. निव्वळ धूळफेक चालली आहे. मोदी सरकार शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हिताचे नाही. आता मोदी सरकारचीही घरी जाण्याची वेळ आली असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली.अण्णांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. त्यांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले असून त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. याचबरोबर, आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 15 आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत. रामलीला मैदानावर गर्दीचा जोर जरी ओसरला असला तरी आंदोलकांमध्ये जोश अद्यापही कायम आहे. गुरुवारी जवळपासच्या राज्यातील 10 हजार शेतकरी इथे दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला.महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी चर्चा केली. पण चर्चेतून तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी 15 मिनिट फोनवरून चर्चा केली. अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी लोकपालविषयी सरकारकडून खूप वेळ घेतला जात आहे, कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे