शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

असंच, आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, ऑलिंपिक विजेत्या खेळाडूची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 20:04 IST

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देअखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या देसातील विविध राज्यांत हे आंदोलन करण्यात आले.

मुंबई - बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रांझ पदकविजेता बॉक्सर आणि देशातील नामवंत खेळाडू असलेल्या विजेंदर सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अन्ना हजारेंना चिमटा काढला आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा दर्शवत, असंच, पण आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, असे ट्विट विजेंदर सिंगने केले आहे. केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांला विरोध करत पंजाबमधील शेतकऱ्यांनी आज भारत बंदची घोषणा केली होती. 

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक अध्यादेशासह पुतळ्याचे दहन  करून संताप व्यक्त केला.अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या देसातील विविध राज्यांत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात या भागातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. पंजाब आणि हरियाणात मोठ्या प्रमाणात आंदोलनाची धग पाहायला मिळाली. येथील शेतकऱ्यांनी रेल्वेगाड्याही अडवल्या होत्या. 

मोदी सरकारने लागू केलेले शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्याच हिताचे जास्त असल्याचे सांगत शेतकरी संघटनांकडून विरोध होत आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी या विधेयकाला विरोध करत आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरियाणाचा रहिवासी असलेल्या आणि माजी ऑलिंपिकविजेता बॉक्सरने भ्रष्ट्राचार निर्मूलनासाठी मोठं आंदोलन उभारणाऱ्या अन्ना हजारेंची आठवण काढली आहे. असंच, आज अन्ना हजारेंची आठवण आली, असे विजेंदरने म्हटलंय.  

आय सपोर्ट भारत बंद, या हॅशटॅगने विजेंदर सिंगने ट्विटरवर पोस्ट केली आहे. विजेंदरची ही पोस्ट रिट्विट करत माजी केंद्रीय कायदामंत्री डॉ. अश्वानी कुमार यांनी त्याचं कौतुक केलंय. तसेच, शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. याबद्दलही विजेंदरने त्यांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, अन्ना हजारे यांनी 2011 साली दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठे आंदोलन उभारले होते. देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध अन्नांनी उभारलेल्या या आंदोलनाची इतिहासात नोंद झाली आहे. या आंदोलनातूनच दिल्लीत सत्ताक्रांती झाल्याचेही देशाने पाहिले आहे. त्यामुळे, आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्ना गप्प का? असा प्रश्न विजेंदरसह अनेकांना पडलाय. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेVijender Singhविजेंदर सिंगFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंद