शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा द्रमुकच्या नेत्याने महिलांना वाटले पैसे, व्हिडिओ व्हायरल, आयोगाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:26 IST

अण्णा द्रमुकच्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते बशीर एके ठिकाणी बसून महिलांना प्रत्येकी ५०० रुपये वाटत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हे ज्या चेपॉक मतदारसंघात घडले आहे, तेथून पूर्वी माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी निवडून येत.

चेन्नई : तामिळनाडूतील चेपॉक मतदारसंघात सत्ताधारी अण्णा द्रमुकचा नेता महिलांना पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची निवडणूक आयोगाने स्वत: दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी द्रमुकने केली आहे. अण्णा द्रमुकच्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते बशीर एके ठिकाणी बसून महिलांना प्रत्येकी ५०० रुपये वाटत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हे ज्या चेपॉक मतदारसंघात घडले आहे, तेथून पूर्वी माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी निवडून येत. यंदा तेथून उदयनिधी स्टॅलिन निवडणूक लढवत आहेत. ते करुणानिधी यांचे नातू व स्टॅिलन यांचे पुत्र आहेत. या मतदारसंघात यंदा द्रमुकचा पराभव करायचा, असा चंग अण्णा द्रमुकने बांधला आहे. त्यामुळे तिथे अण्णा  द्रमुकतर्फे भरपूर पैसा वाटला जात असल्याचे आरोप होत आहेत. पण त्यातील एक प्रकार कॅमेऱ्यातच टिपला गेल्याने अण्णा द्रमुकचे व भाजपचे नेतेही गप्प आहेत.

तक्रार का करायची?nद्रमुकने मात्र निवडणूक आयोगाने या प्रकाराची स्वत:हून दखल घ्यावी आणि सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. nतुम्ही या प्रकाराची तक्रार करणार का, असे विचारता द्रमुकचे प्रवक्ते सरवरण अण्णादुराई म्हणाले की, पैसे वाटले जात असल्याचे उघड दिसत असताना पुन्हा आम्ही तक्रार का करावी? कोणी तक्रार करण्याची आयोगाने वाट पाहताच कामा नये. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग