शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मी कोणत्याही थराला जाऊ शकते, तू विचार पण करू शकत नाहीस"; अंजूने नवऱ्याला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 13:06 IST

अंजूने अरविंदला धमकी दिली की ती तिच्या मुलांसाठी भारतात येईल. दोघांमधील फोनवरची ही चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूचा नवा कारनामा समोर आला आहे. पाकिस्तानात जाऊन अंजू नसरुल्लाहसोबत निकाह केल्यानंतर फातिमा झाली आहे. अंजूने आता पती अरविंदला पाकिस्तानातून फोन करून धमकी दिली आहे. यावेळी तिने अरविंदला शिवीगाळ करत मी कोणत्याही थराला जाऊ शकते, तू विचार पण करू शकत नाहीस असं म्हटलं आहे. अंजूने अरविंदला धमकी दिली की ती तिच्या मुलांसाठी भारतात येईल. दोघांमधील फोनवरची ही चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजूने पती अरविंदला फोन करून खूप काही सांगितले. अंजू अरविंदला सांगते की, ती मुलांसाठी भारतात येणार आहे. यानंतर अरविंदलाही राग आला आणि त्याने अंजूला खूप वाईट म्हटलं आहे. अरविंदला धमकी दिल्यावर त्याने अंजूला सांगितले की तू माझ्यासाठी मेली आहेस. तू पाकिस्तानात नाच, राहा... काहीही कर. तू लग्न केलं आहे आणि तू खोटं बोलत आहेस. 2 मिनिटे 55 सेकंदाच्या या ऑडिओमध्ये खूप शिवीगाळ केली आहे. 

अंजू अरविंदला म्हणाली तू माझ्याबद्दल काय बोलत आहेस? तू मीडियाच्या इशार्‍यावर नाचतोय. अरविंदने अंजूला सांगितले की, तू पाकिस्तानात नाचत आहेस. तू खोट्यावर खोटं बोलत आहेस. अंजू म्हणाली ही माझी इच्छा आहे, मला रोखणारा तू कोण आहेस? अरविंद म्हणाला तू मर. तू माझ्यासाठी मेली आहेस. त्याचवेळी अंजूने अरविंदवर गंभीर आरोप केले. ती म्हणाली मी तुझ्यासोबत राहत होते. हे माझे दुर्दैव होते.

याच दरम्यान मुलांबाबत दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुलं माझ्याकडेच राहतील, असं अरविंद म्हणाला. या संभाषणादरम्यान अरविंद अनेकवेळा सांगत होता की मला तुझ्य़ाशी बोलायचं नाही. पण अंजू तिचा राग काढत राहिली. अंजू अलवरच्या भिवडी शहरात राहत होती. पती आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला न सांगता ती 20 जुलै रोजी गुपचूप पाकिस्तानात गेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने तिचे फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत निकाह केला आहे. तिने धर्म बदलला आणि अंजूचे नाव बदलून फातिमा केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान