शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

धक्कादायक! फुले तोडल्याच्या कारणावरून अंगणवाडी सेविकेचे कापले नाक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 12:07 PM

बेळगाव : अंगणवाडीतील मुलांनी फुले तोडल्याच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकेवर एकाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे नाक कापले जाऊन ती गंभीर ...

बेळगाव : अंगणवाडीतील मुलांनी फुले तोडल्याच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकेवर एकाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे नाक कापले जाऊन ती गंभीर जखमी झाल्याची घटना बसुर्ते (जि. बेळगाव) येथे घडली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुगंधा गजानन मोरे (वय ५०), असे सेविकेचे नाव आहे.सोमवारी दुपारी अंगणवाडीतील मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडले होते. त्यावेळी त्या मुलांनी शेजारील घराच्या अंगणातील फुले तोडली. हा प्रकार घरमालकाच्या निदर्शनास येताच त्याने त्या प्रकाराला सुगंधा मोरे यांनाच जबाबदार धरून अर्वाच्य शिवीगाळ करत त्यांच्यावर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून, त्यांचे नाक कापले गेले आहे. या घटनेनंतर सुगंधा यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद काकती पोलिस ठाण्यात झाली आहे.

महिला मंत्र्यांच्या जिल्ह्यातच महिलांवर हल्लेमहिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जिल्ह्यात, शहर परिसरातच महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना वाढू लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. न्यू वंटमुरी येथे एका महिलेची विवस्त्र धिंड काढण्याचा अमानुष प्रकार घडला होता. त्याला अजून महिनाही उलटत नाही, तोवर आता बसुर्ते येथे अंगणवाडी सेविकेवर हल्ला करून तिचे नाक कापण्याचा प्रकार घडला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगाव