शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराला बनवलं स्टडी कॉर्नर, यूट्यूबवरुन केला अभ्यास; कोचिंगशिवाय रेल्वेत मिळाल्या 2 नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 11:09 IST

बोन्था रेड्डी याला सरकारी नोकरीची तयारी करायची होती. पण कोणत्याही कोचिंगमध्ये जाण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते.

जर एखादं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली तर ते नक्कीच पूर्ण होतं. बोन्था तिरुपती रेड्डी यांचीही अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे. 27 वर्षीय बोन्था याला  रेल्वेत दोनदा सरकारी नोकरी मिळाली. बोन्था रेड्डी याला सरकारी नोकरीची तयारी करायची होती. पण कोणत्याही कोचिंगमध्ये जाण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते. आर्थिक परिस्थिती बिकट होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील पोसुपल्ली गावातील बोन्था रेड्डी याला कोणत्याही कोचिंगशिवाय रेल्वेत दोन नोकऱ्या मिळाल्या. त्याच्याकडे फारच कमी संसाधने होती पण त्यांनी संसाधनांचा चांगला वापर केला. रेड्डी य़ाने यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी केली. विविध यूट्यूब चॅनलद्वारे जीके आणि रिझनिंगची तयारी केली.

बोन्थाने मॅथ्स, फिजिक्स आणि कॉम्युटर सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे. पदवीनंतर त्याने आरआरबीची तयारी सुरू केली. बर्‍याच मेहनतीनंतर, दक्षिण-पश्चिम रेल्वे, बेंगळुरू विभागात ग्रेड-IV सहाय्यक आणि एक व्यावसायिक कम तिकीट लिपिक म्हणून दोन नोकऱ्या मिळवल्या. बोन्था रेड्डी याने सांगितले की, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून त्याने वडिलांना शेतीत मदत करण्याचा आणि परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. 

बोन्था त्यामुळेच कोचिंगला गेला नाही. घरात मोबाईल नेटवर्क चांगले नसल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळेच शेताजवळ बांधलेल्या मंदिराचा अभ्यासासाठी वापर केला. रेड्डी याच्या म्हणण्यानुसार, तो रोज 10 ते 12 तास अभ्यास करत असे. तो संध्याकाळी 7 ते 11 या वेळेत यूट्यूबवर क्लासेससाठी हजर राहायचा आणि त्याच्या नोट्स तयार करायचा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी