शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Andhra Pradesh: वीज कपातीमुळे रुग्णांची वणवण; मोबाईल आणि मेणबत्तीच्या उजेडात महिलेची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:13 IST

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील नरसिपट्टणम येथील एका रुग्णालयात लाईट नसल्यामुळे मोबाईल आणि मेणबत्तीच्या उजेडात महिलेची प्रसूती केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नरसिपट्टणम: सध्या आंध्र प्रदेशातील नागरिकांना प्रचंड वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती इतकी बिटक झाली आहे की, रुग्णालयांनाही वीज मिळत नाहीये. यातच राज्यातील नरसिपट्टणम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नरसिपट्टणममधील एनटीआर हॉस्पिटलमध्ये वीज नसल्यामुळे एका महिलेची मोबाईलच्या उजेडात प्रसूती करावी लागली. सुदैवाने आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत.

महिलेच्या पतीने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी प्रसूती वेदना होत असल्याने महिलेला एनटीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयात वीज नव्हती. परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात जनरेटर किंवा इतर बॅकअप उपलब्ध नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकरात लवकर सेल फोन, मेणबत्त्या आणि टॉर्चची व्यवस्था करा. याच मेणबत्त्या आणि मोबाईलच्या उजेडात महिलेची प्रसूती करण्यात आली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल दुसरीकडे जांगरेड्डीगुडेम येथील सरकारी रुग्णालयातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. रात्रभर वीज नसल्याने रुग्ण वॉर्डात अंधारात मोबाईलचे दिवे वापरताना दिसत होते. अशा परिस्थितीत त्यांना विश्रांतीही घेता येत नसल्याचे रुग्णांनी सांगितले. यावर रुग्णालय प्रशासनाने जनरेटरमध्ये डिझेल नसल्याने वीज उपलब्ध नसल्याचे सांगितले. रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राज्यात 50 टक्के वीज कपात जाहीरवाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश वीज विभागाने 50 टक्के वीज कपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे जनतेला त्रास होत आहे. राज्यात दररोज सुमारे पाच लाख युनिट विजेचा तुटवडा भासत आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जगन मोहन रेड्डी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशWomenमहिलाhospitalहॉस्पिटलelectricityवीज