शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तितली चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओदिशात आता पुराची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 00:33 IST

भुवनेश्वर/विजयवाडा : तितली चक्रीवादळाने ओदिशा व आंध्र प्रदेशला गुरुवारी मुसळधार पावसासह तडाखा दिला. त्यामुळे या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये नद्या, ...

भुवनेश्वर/विजयवाडा : तितली चक्रीवादळाने ओदिशा व आंध्र प्रदेशला गुरुवारी मुसळधार पावसासह तडाखा दिला. त्यामुळे या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले असून त्यामुळे तिथे पूर येण्याची भीती आहे.या चक्रीवादळात दोन्ही राज्यांत १२ जणांचा बळी गेला. अनेक झाडे, विजेचे खांब कोसळले. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. तसेच वीजपुरवठाही अनेक ठिकाणी खंडित झाला. ओदिशाचा गंजम व आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम या जिल्ह्यांना तितली चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या. आंध्र प्रदेशमधील १६ जलप्रकल्पांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. (वृत्तसंस्था)नुकसान भरपाईआंध्रमध्ये मरण पावलेल्या आठ जणांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. वादळामुळे या राज्यात किती नुकसान झाले याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांना दूरध्वनी करून जाणून घेतली. ओदिशातील तीन जिल्ह्यांतील ६० लाख लोकांना वादळाचा तडाखा बसला आहे.गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात पाऊस कोसळत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश