शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जगनमोहन रेड्डी यांनी जिंकले आंध्र प्रदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:29 IST

आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४८ जागा मिळविल्या.

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४८ जागा मिळविल्या. जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांना चांगलाच धक्का दिला. त्यांच्या तेलुगू देसमला २६ तर पवन कल्याण यांच्या जनसेनेला एक जागा मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेस, भाजपला एकही जागा मिळाली नाही. आंध्र प्रदेशला जगनमोहन यांच्या रुपात नवा मुख्यमंत्री लाभणार असून, ते ३० मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे समजते.>ओडिशा : पटनाईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रीभूवनेश्वर : मोदींच्या लाटेतही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. पटनाईक हे सलग पाचव्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री बनणार आहेत.बिजू जनता दलाचे (बिजद) प्रमुख नवीन पटनाईक हे गेल्या १९ वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. जनतेने त्यांना आणखी पाच वर्षे दिली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका मात्र भाजपाने पटकावली आहे. २000 पासून काँग्रेस येथे प्रमुख विरोधी पक्ष होता. मावळत्या सभागृहात काँग्रेसच्या १६ जागा होत्या, तर भाजपाच्या १0 जागा होत्या. भाजपाने आपल्या जागा दुपटीपेक्षा जास्त वाढविल्या आहेत. काँग्रेसच्या जागा मात्र घटल्या.>अरूणाचल प्रदेश : भाजप पुन्हा एकदा सत्ताधीशइटानगर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची जादू चाललेली असतानाच अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी भाजपने सत्ता कायम ठेवली आहे. ६० पैकी ३१ जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने तीन जागा आधीच जिंकलेल्या होत्या. येथे प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या जदयूने आपले खातेही उघडले आहे. काँग्रेसला तीन जागा जिंकता आल्या.>सिक्किम : काट्याची टक्कर, चामलिंग सरकार येणार?गंगटोक : ३२ जागा असलेल्या सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत काट्याची टक्कर पाहावयास मिळाली. येथे सत्ताधारी सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) व विरोधी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (एसकेएम) चुरस निर्माण झाली. दोन्ही पक्षांना प्रत्येकी १६ जागा मिळाल्या होत्या. मुख्यमंत्री व एसडीएफ प्रमुख पवन चामलिंग यांनी पोकलोक कामरंग मतदारसंघातून विजय मिळवला.

टॅग्स :Andhra Pradesh Assembly Election 2019आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019OdishaओदिशाArunachal Pradesh Assembly Election 2019अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2019Sikkim Assembly Election 2019सिक्किम विधानसभा निवडणूक 2019