शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

आंध्र प्रदेशात विषारी वायू गळतीमुळे 95 जण रुग्णालयात दाखल, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 15:17 IST

Andhra Pradesh Gas leak: याप्रकरणी मंत्री जी. गुडीवाडा अमरनाथ  यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

विशाखापट्टणम:  आंध्र प्रदेशातील अच्युतापुरम येथील एका बियाणे कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना घडली. या गॅस गळती झाल्यामुळे आतापर्यंत एकूण 95 जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 121 जण आजारी पडले आहेत. दरम्यान, याप्रकरणी मंत्री जी. गुडीवाडा अमरनाथ  यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, नमुने आयसीएमआरकडे (ICMR) तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. जेणेकरून हे जाणूनबुजून केले गेले की नाही हे कळू शकेल. 

ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. ही कंपनी अनकपल्ली जिल्ह्यातील अच्युतपुरम परिसरात आहे. गॅस गळतीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनकापल्ले जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी हेमंत यांनी सांगितले की, येथे दाखल असलेल्या सर्व 53 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. बहुतेक लोकांनी श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या होणे अशी तक्रार केली आहे. काल 94 कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 53 सरकारी रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित 41 जणांना जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. गॅस गळतीनंतर जवळपास 50 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात बहुतांश महिला होत्या.

याआधीही अशा घटनाजून महिन्यातच विशाखापट्टणममध्ये अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये 140 कामगारांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पोरस प्रयोगशाळेतील या गॅस गळतीत अनेक कर्मचारी जागीच बेशुद्ध पडले होते. दोन महिन्यांपूर्वी अच्युतापुरम सेझमध्ये गॅस गळती झाली होती. त्यानंतर गॅस गळतीमुळे सुमारे 200 महिला कामगार आजारी पडल्या. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशhospitalहॉस्पिटल