शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग; आंध्र प्रदेशच्या अर्थमंत्र्यांनी सिंगापूरमध्ये घेतले दंतोपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 13:35 IST

राज्य सरकारने कोणतीही खळखळ न करता अर्थमंत्र्यांना उपचाराचे पैसेही देऊन टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

हैदराबाद- आम्हाला विशेष दर्जा द्या, पूरामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत द्या अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू करत असतात. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळामधील सदस्यांनी मात्र करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी सुरुच ठेवली आहे. आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री यनमाला रामकृष्णूडू यांनी दातांवरील उपचारांसाठी थेट सिंगापूर गाठले आणि करदात्यांच्या पैशातून 2.88 लाख रुपये खर्च करुन ते परतले. राज्य सरकारने कोणतीही खळखळ न करता त्यांना उपचाराचे पैसेही देऊन टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.यावर्षी 12 एप्रिल रोजी रामकृष्णुडू यांनी सिंगापूरमधील अझुर डेंटल येथे रुट कनाल उपचार घेतले. या उपचारासांठी लागलेले सर्व पैसे त्यांना 23 ऑगस्ट रोजी राज्याच्या डॉ. एनटीआर विद्या सेवा ट्रस्ट आरोग्यविभागाने देऊन टाकले. जनरल अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटने ऑर्डर  क्रमांक 1844 नुसार हे पैसे देऊन टाकले. या विभागाचे सचिव श्रीकांत नागुलापल्ली यांनी या ऑर्डरसाठी अर्थ मंत्रालयाच्या कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. हे पैसे आता मंत्रिमहोदयांच्या पगाराच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.

यनमाला रामकृष्णुडू हे आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर उर्वरित राज्याच्या अर्थ खात्याची धुरा सांभाळत आहेत. एकीकडे निधी कमी पडत असल्याने अनेक आघाड्यांवर राज्य सरकारला पैसे उभे करावे लागत आहे. नव्या राज्याची नवी राजधानी अमरावती येथे बांधण्यासाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयांचे रोखे लोकांना दिले. त्यामध्ये 10.32 टक्के व्याजदरही निश्चित करण्यात आला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अमरावती हे आरोग्यसेवांचे एक मोठे केंद्र असेल अशी घोषणा नेहमी करत असतात. मात्र आता त्यांच्याच अर्थमंत्र्यांनी दातांच्या उपचारांसाठी सिंगापूरला जाऊन करदात्यांचा पैसा वाया घालवल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे.  रुट कॅनलचे उपचार आंध्र प्रदेशात किंवा भारतात इतरत्र उपलब्ध नाहीत का असा प्रश्न आंध्र सरकारला समाजमाध्यमावर विचारला जात आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू