शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंसह 15 जणांविरोधात अटक वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 11:35 IST

महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाविरोधात 2010 मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह 15 जणांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

अमरावती (आंध्र प्रदेश) : महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाविरोधात 2010 मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह 15 जणांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले आहे. महाराष्ट्रातील धर्माबाद (जि. नांदेड) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. आर. गजभिये यांनी गुरुवारी या प्रकरणात नायडू यांच्यासह सर्वांना अटक करून 21सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.2010 मध्ये महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोदावरी नदीवरच्या बाभळी प्रकल्पाचा प्रश्न पेटला होता. त्यावेळी एन. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशात विरोधी नेते असताना या प्रकल्पाविरोधात आंदोलन केले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करून पुण्यातील तुरुंगात ठेवले होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. याप्रकरणी येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, महाराष्ट्रातील पोलिसांना एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह 15 जणांना अटक करून 21 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, धोकादायक शस्राद्वारे इजा पोचविणे, धमकावणे आदी कलमांखाली एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह 15 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान,  याप्रकरणी एन. चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री एन लोकेश यांनी सांगितले की, नायडू आणि तेलगू देसमचे अन्य नेते या प्रकरणात न्यायालयात हजर राहतील. त्यांनी तेलंगणच्या हितासाठी लढा दिला होता. तसेच, त्यांनी याप्रकरणी जामीनही मागितला नव्हता. 

काय आहे बाभळीचा वाद?- 1995 मध्ये बाभळी प्रकल्पाला मान्यता मिळाली. 2004 मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली. दरम्यान, या प्रकल्पामुळे आंध्रप्रदेशला पाणी मिळणार नाही, असा आक्षेप आंध्रप्रदेशने घेतला होता. मात्र, हे पाणी महाराष्ट्रचे आहे, त्यामुळे हे पाणी महाराष्ट्रातच राहणार असा दावा महाराष्ट्राने केला. त्यानंतर या प्रकल्पाविरोधात  एन. चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या समर्थकांसह ठिय्या आंदोलन सुरू केले होते.  

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूTelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेश