शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आॅनर किलिंग; मुलीच्या सासू-सास-याची केली हत्या, मुलगा अन्य जातीतील असल्याने राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:18 IST

आपल्या मुलीने खालच्या जातीतील तरुणाशी विवाह केल्यामुळे संतापलेल्या त्या तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावातील ही घटना आहे.

पाटणा : आपल्या मुलीने खालच्या जातीतील तरुणाशी विवाह केल्यामुळे संतापलेल्या त्या तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावातील ही घटना आहे. हल्ल्यात दाम्पत्याच्या दोन मुलीही जखमी झाल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल चौधरी (५0) व त्यांच्या पत्नी शांती देवी (४५) आपल्या मुलींसह घराच्या गच्चीवर झोपले होते. ते झोपेत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्या चोधरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यात कमल चौधरी यांच्या मुली किरण देवी (२0) व सुश्मिता (१५) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना वाराणसीमधील इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये भरती करण्यात आले आहे.हे आॅनर किलिंगचे प्रकरण आहे, असे पोलिसांनी सांगितले. जखमी किरण देवीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ धर्मेंद्र चौधरी याचे तीन महिन्यांपूर्वी संबंधित मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्या दोघांनी लग्न केले आणि ते दिल्लीला राहायला गेले.गावकºयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी राजपूत घराण्यातील आहे. धर्मेंद्र हा तरुण खालच्या जातीतील असल्याने मुलीच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. तरीही दोघांनी पळून जाऊ न विवाह केल्यामुळे मुलीचे नातेवाईक चिडले होते. सतत आपण बदला घेऊ, अशी धमकी नेहमी देत असत. मुलीचा भाऊदेखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. (वृत्तसंस्था)यूपी पोलिसांची तपासासाठी घेणार मदतपोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुलीच्या घरातील तिघांची नावे आहेत, अशी माहिती कैमूरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. पोलिसांची तीन पथके मारेकºयांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. हे गाव बिहार व उत्तर प्रदेशच्या सीमेवर आहे. त्यामुळे आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांंचीही मदत मागितली आहे, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.

टॅग्स :Crimeगुन्हा