शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

आणि राहुल गांधींचे गणित चुकले, चूक लक्षात येताच सुधारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 21:31 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी त्यांच्या पक्षाची सगळी राजकीय गणिते अगदी अचूक येत असल्याचे दिसत आहे. मात्र राहुल गांधींनी ट्विटरवर टाकलेले एक गणित मात्र चुकले आहे.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी त्यांच्या पक्षाची सगळी राजकीय गणिते अगदी अचूक येत असल्याचे दिसत आहे. मात्र राहुल गांधींनी ट्विटरवर टाकलेले एक गणित मात्र चुकले आहे. आज राहुल गांधींनी महागाईच्या मुद्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी महागाईची वाढ दर्शंवणारा एक आलेख प्रकाशित केला. मात्र या आलेखातील टक्केवारीमध्ये मोठी गफलत झाल्याचे निदर्शनास आल्यावर टीका सुरू झाली. मात्र चूक लक्षात येताच राहुल गांधी यांनी हे ट्विट काढून सुधारित ट्विट अपडेट केले. या आलेखामध्ये महागाईची दाखवण्यात आलेली टक्केवारी 100 टक्क्यांहून अधिक फुगवून सांगितल्याचे निदर्शनास आले. राहुल गांधींच्या या ट्विटमध्ये महागाईची टक्केवारी फुगवून सांगितली गेली होती. हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्यावर त्वरित सुधारणा करून आकडेवारी बदलून राहुल गांधींनी सुधारित ट्विट केले. दरम्यान, गुजरातमध्ये 22 वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता संकटात आहे. अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे भाजापाविरोधी मतदारांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकल्याचे दिसत आहे. त्याचेच प्रतिबिंब आज जाहीर झालेल्या एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या ओपिनियन पोलमध्ये दिसले आहे. या पोलममध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात 22 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच आणि भाजपात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसत असून. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा निसटत्या बहुमतासह सत्ता राखण्याची शक्यता असून, भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तंवण्यात आला आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस मुख्यालयात पार्टी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पार्टीतील दिग्गज नेतेमंडळीदेखील काँग्रेस मुख्यालयात उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, कर्नाटकचे सिद्धारमय्या, हिमाचल प्रदेशचे वीरभद्र सिंह,  वी.नारायणस्वामी, मेघालयचे मुकुल संगमा आणि वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधियादेखील हजर होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Gujaratगुजरात