शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात महागडे लग्न; अनंत-राधिका यांच्या लग्नावर किती रुपये खर्च झाले? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 19:12 IST

मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

Mukesh Ambani : शुक्रवारी,12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाह बंधनात अडकले. गेल्या अनेक महिन्यांपासून या लग्नाची देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेरेमनीपासून या शाही लग्नाची सुरुवात झाली. अजूनही या लग्नाचे काही कार्यक्रम बाकी आहे. मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. 

मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या लग्नात विदेशातील अनेक कलाकारांनी परफॉर्म केले आहे. यासाठी त्यांना दिलेल्या पैशाचीही बरीच चर्चा सुरू आहे. आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, मुकेश अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नावर अंदाजे 5000 कोटी रुपये खर्च केले आहेत. याहून चकीत करणारी बाब म्हणजे, ही रक्कम मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या फक्त 0.5 टक्के आहे. 

जगातील सर्वात महागडे लग्नया आकड्याने राजकुमारी डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या 1,361 कोटी रुपये आणि शेखा हिंद बिंत बिन मकतूम आणि शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या 1,144 कोटी रुपयांच्या प्रतिष्ठित विवाहांच्या खर्चालाही मागे टाकले आहे. जगातील सर्वात महागड्या लग्नांमध्ये याची गणना केली जात आहे. विशेष म्हणजे, लग्नापूर्वी आयोजित कार्यक्रमांवर 2500 कोटी रुपये खर्च करण्यात केल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

देश-विदेशातील अनेकांची हजेरीअनंत आणि राधिका यांच्या लग्नाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या शाही सोहळ्यासाठी बॉलिवूड, हॉलिवूड, क्रीडा, व्यवसाय आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. किम कार्दशियन, जॉन सिना आणि ॲडेल, जस्टीन बिबर यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींमुळे हा लग्नसोहळा आणखीनच आकर्षक बनला. 

दोनदा ग्रँड प्री-वेडिंग पार्टीचे आयोजनमुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही. या शाही उत्सवाची सुरुवात मार्चमध्ये जामनगरमध्ये आयोजित तीन दिवसीय प्री-वेडिंग पार्टीने झाली. रिहाना, एकॉन आणि दिलजीत दोसांझसारख्या कलाकारांनी त्यात परफॉर्म केले. तर, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांसारखे अब्जाधीशही त्यात सहभागी झाले होते. यानंतर, जूनमध्ये इटली ते फ्रान्स या लक्झरी क्रूझवर दुसरा प्री-वेडिंग सोहला आयोजित करण्यात आला. त्यात, कॅटी पेरी आणि बॅकस्ट्रीट बॉईजसारखे कलाकार सामील झाले.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीanant ambaniअनंत अंबानीmarriageलग्नMumbaiमुंबई