शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आनंदीबेन लढवणार नाहीत गुजरात विधानसभा निवडणूक, पत्र लिहून अमित शाहांना दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 6:21 PM

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी पत्र लिहून अमित शाहांना कळवलं आहे.

अहमदाबाद- गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी पत्र लिहून अमित शाहांना कळवलं आहे. भाजपाच्या 75 वर्षांनंतर निवडणूक न लढवण्याच्या धोरणाचा हवाला देत त्यांनी विधानसभा लढवण्यास नकार दिला आहे.आनंदीबेन यांनी पत्र लिहून याबाबत अमित शाहांना माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, मी 1998पासून आमदार असून, पक्षानं दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु दोन वर्षांच्या आतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर विजय रुपानी यांना भाजपानं गुजरातचे मुख्यमंत्री बनवले.रुपानी हे भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या जवळचे समजले जातात. डिसेंबरमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीआधीच आनंदीबेन सक्रिय झाल्या होत्या. तसेच गुजरातमध्ये त्याच भाजपाचा चेहरा असतील, अशी अटकळही बांधली जात होती. आता त्यांनी स्वतः पत्र लिहून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर केलं आहे.शाह यांना पत्र लिहून आनंदीबेन म्हणाल्या, माझ्या घाटलोडिया मतदारसंघातून इतर कोणत्या तरी भाजपाच्या तरुण कार्यकर्त्याला तिकीट द्यावी, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी पाहिजे, त्यांना मार्गदर्शन दिलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :GujaratगुजरातElectionनिवडणूक