शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलांनी केली कमाल! 'या' बाबतीत जगाला टाकलं मागं; आनंद महिंद्रा म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:47 IST

जगात महिला व्यावसायिक वैमानिकांच्या बाबतीत भारतीय महिला पहिल्या क्रमांकावर आहेत.

नवी दिल्ली : एकिकडे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर येत आहे. त्याच बरोबर इतर क्षेत्रातही भारत यशाची नवी उंची गाठत आहे. असेच एक क्षेत्र म्हणजे Aviation Sector, या क्षेत्रात भारतीय महिलांचा दबदबा पाहायला मिळत आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सचे आकड्यांनी जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली आहे. लक्षणीय बाब म्हणजे महिला व्यावसायिक वैमानिकांच्या संख्येच्या बाबतीत भारत अव्वल क्रमांकावर आहे. 

महिला वैमानिकांची आकडेवारी केली शेअरमहिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून या कामगिरीवर महिला शक्तीला सलाम ठोकला आहे. खरं तर आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते अनेकवेळा फोटो आणि व्हिडीओ ट्विट करत असतात. आता त्यांनी वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सची आकडेवारी शेअर केली आहे. यामध्ये 2021 पर्यंतच्या महिला व्यावसायिक वैमानिकांची संख्या दाखवण्यात आली आहे. तसेच या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. 

कॅप्शननं वेधलं लक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून भारतीय महिलांना सलाम ठोकला आहे. "आठवड्याच्या मध्यात 'जोश' मिळवण्यासाठी काहीतरी शोधत आहात? तर मग हे पाहा. हॅलो वर्ल्ड, नारी शक्ती कामावर आहे...", अशा आशयाचे ट्विट करून आनंद महिद्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधले. महिंद्रा यांनी केलेल्या या ट्विटवरून युजर्स भारतीय महिलांचे अभिनंदन करत आहेत. या ट्विटमध्ये असलेल्या आकड्यांनुसार , भारतात महिला व्यावसायिक वैमानिकांची संख्या अमेरिका, ब्रिटेन, चीन, जर्मनी आणि जपानसहित अन्य देशांहून 12.4 टक्के आहे. 

भारतीय महिला अव्वल स्थानी आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये MidweekMomentum हा हॅशटॅग वापरला आहे. जिथे भारत 12.4% महिला व्यावसायिक वैमानिकांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 9.9 टक्क्यांसह आयर्लंडचा नंबर लागतो. याशिवाय इतर देशांतील महिला वैमानिकांची संख्या पाहिली तर दक्षिण आफ्रिका 9.8%, ऑस्ट्रेलिया 7.5%, कॅनडा 7.0%, जर्मनी 6.9%, यूएसए 5.5%, यूके 4.7%, न्यूझीलंड 4.5% आणि जपान 1.3% आहे.

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीWomenमहिलाpilotवैमानिकAnand Mahindraआनंद महिंद्रा