शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra: 'थार' चालवताना पडले प्रेमात अन् गुडघ्यावर बसून केले प्रपोज, आनंद महिंद्रा म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 17:51 IST

Viral Video: आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पाहा हा थक्क करणारा व्हिडिओ.

मुंबई: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा ते सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेले फोट आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून लोकांची उत्सुकताही वाढते. नुकतच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ 

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क होऊन जाल. हा व्हिडिओ एक मुलगा आणि एका मुलीचा आहे. व्हिडिओमध्ये दोघेजण महिंद्राची थार गाडी चालवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघांमधील प्रेमही दाखवण्यात आले आहे. या अतिशय रोमँटिक व्हिडिओवर नेटकरी विविध कमेंट्स करत आहेत. 

पाहा व्हिडिओ

विशेष म्हणजे हा खरा व्हिडिओ नसून, आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ जाहिरात व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये एका प्रेमी युगुलाच्या माध्यमातून महिंद्रा थार वाहनाची जाहिरात दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी थारमधून रेस करताना दिसत आहेत. दोघेही डोंगराळ मार्गावर धावतात आणि यादरम्यान त्यांना एकमेकांवर प्रेम होते. 

अप्रतिम व्हिडिओ

शर्यतीच्या शेवटी मुलगा मुलीला प्रपोज करतो आणि 'फेरे तो हो गये' असे सांगतो. मुलीला याचा धक्का बसतो आणि ती त्या मुलाला सांगते 'तू अशक्य आहेस'. ज्याच्या प्रत्युत्तरात तो मुलगा म्हणतो 'अशक्य..असे काही नाही.' व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'मेरे सपनो की रानी...' हे गाणे ऐकू येत आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्रा