शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपावरून ‘इंडिया’ आघाडीतील बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले सध्यातरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 13:22 IST

'I.N.D.I.A.' Alliance: विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीची बैठक गुरुवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या बैठकीमध्ये आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत काही आराखडा निश्चित होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सज्ज झालेल्या विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीची बैठक गुरुवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या बैठकीमध्ये या आघाडीच्या बोधचिन्हासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीतून आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत काही आराखडा निश्चित होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीतील जागावाटपावरून नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी सूचक विधान केलं आहे.

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी फारुख अब्दुल्ला आज मुंबईत आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ते म्हणाले की, सध्यातरी जागावाटपाबाबत घाई करून चालणार नाही. तुम्ही चिंता करून नका. जे व्हायचं आहे, ते होईल. काय घडणार आहे हे केवळ देवाला माहिती आहे. जास्तीत जास्त बहुमत मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

यावेळी भाजपाने २०२४ च्या निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकण्याच्या केलेल्या दाव्याचीही अब्दुल्ला यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, भाजपावाले नेहमीच दावे करत असतात. कदाचित त्यांना एवढ्या जागा मिळणार आहेत, असा देवाकडून त्यांना असा संदेश आला असावा. मात्रा आम्हाला देवाकडून असा फोन आलेला नाही, असे ते म्हणाले. 

केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी आकारास येत असलेल्या इंडिया आघाडीत काँग्रेससह देशातील अनेक भाजपाविरोधी पक्ष सहभागी झाले आहे. यातील अनेक पक्ष हे प्रादेशिक पातळीवर एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे या पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाBJPभाजपाMumbaiमुंबई