शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

‘आप’च्या गळतीचे संकेत?; ED च्या धाडीनंतर मंत्री आनंद यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 05:50 IST

मंत्री आनंद यांचा राजीनामा; गेल्या वर्षी पडल्या ईडीच्या धाडी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ईडीने केलेली अटक वैध ठरवून दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना धक्का देऊन २४ तास लोटत नाही तोच त्यांचे सहकारी समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी मंत्रीपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीला गळती लागण्याचे संकेत दिले.

आपले नाव भ्रष्टाचाराशी जोडले जाऊ नये, म्हणून राजीनामा दिल्याचे आनंद यांनी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आनंद यांच्या निवासस्थानासह नऊ ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या.

ईडी अटकेविरोधात केजरीवाल सुप्रीम कोर्टातकेजरीवाल यांची ईडीने केलेली अटक वैध ठरविणाऱ्या दिल्ली कोर्टाच्या निकालाला आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेची तत्काळ दखल घेणार असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. पण, त्यांनी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.

२६ एप्रिलला आणखी एक  अग्निपरीक्षाचौफेर संकटांनी घेरलेल्या आपला दिल्लीत महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकींमुळे आणखी एका अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ही निवडणूक २६ एप्रिल रोजी होणार असून, दोन्ही पदांवर विजयी होण्यासाठी भाजपकडून ‘आप’ची पूर्ण कोंडी होणार हे स्पष्ट आहे.

‘आप’चा भाजपवर पलटवार  nज्या राजकुमार आनंद यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यापासून सर्व बडे भाजपचे नेते भ्रष्टाचाराचा आरोप करीत होते त्या आनंद यांचे हार घालून भाजपमध्ये स्वागत होते की नाही, हे आता लवकरच दिसणार आहे, अशा शब्दांत पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी भाजपवर पलटवार केला. या लढाईत आमचे काही लोक कच खातील. nआमचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा आम्ही करीत होतो, तेव्हा त्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हते. पण, आज आमचा दावा खरा ठरला आहे, असे संजय सिंह म्हणाले. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयministerमंत्री