शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Mathura: सरकारी गाडीतून पाळीव कुत्र्याची 'सैर', फोटो काढला म्हणून पत्रकारावर भडकला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:52 IST

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे सरकारी वाहनाचा गैरवापर केल्याची घटना समोर आली आहे.

मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे सरकारी वाहनाचा गैरवापर केल्याची घटना समोर आली आहे. येथे सहाय्यक महापालिका आयुक्त त्यांच्या सरकारी गाडीत आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवत होते. हा प्रकार पाहिल्यावर पत्रकाराने याचा फोटो काढला असता सहाय्यक महापालिका आयुक्त पत्रकारावर चांगलेच भडकले. यानंतर त्यांनी पत्रकाराशी गैरवर्तन करत शिवीगाळ देखील केली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिव्हिल लाईन परिसरात एक पत्रकार महापालिकेच्या शासकीय वाहनात फिरणाऱ्या पाळीव कुत्र्याचा व्हिडीओ बनवत होता. जेव्हा त्या पत्रकाराने फोटो काढला तेव्हा गाडीतील एका व्यक्तीने संबंधित पत्रकाराला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. पत्रकार आणि महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली. 

स्वत:ला समजत होता 'SDM' वाद चिघळताच लोकांची घटनास्थळी गर्दी जमायला सुरूवात झाली. अंडरवेअर घातलेला गाडीतील माणूस स्वत:ला उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणत होता, जो मथुरा महापालिकेत सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणून तैनात आहे. पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, खूप वेळ हा वाद रंगला होता, खूप समजावून सांगितल्यानंतर तुम्ही कोण आहात, असे विचारले असता त्यांनी स्वत:ला उपविभागीय दंडाधिकारी असल्याचे म्हटले. 

पत्रकाराने म्हटले की, त्या व्यक्तीने नंतर मान्य केले की तो महानगरपालिकेत सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहे. तसेच त्याने स्वतःचे नाव राजकुमार मित्तल असल्याचे सांगितले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मथुरा महापालिकेसोबतच जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अद्यापही या घटनेवर मौन्य बाळगले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmathura-pcमथुराGovernmentसरकारdogकुत्राJournalistपत्रकार