शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोदींनी दिला खास 'टास्क'! म्हणाले- आता वेळ वाया न घालवता गाठायचेय लक्ष्य

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 22, 2020 15:34 IST

AMU 100 Years : मोदी म्हणाले, 1920मध्ये तेव्हाच्या तरुणांनी एक लक्ष्य समोर ठेवले होते, तेव्हा 1947ला देश स्वतंत्र्य झाला. मात्र, 2020 पासून 2047 पर्यंतचा काळ आता अत्यंत महत्वाचा आहे.  कारण आता देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहे.

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी  महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतिहासापासून ते आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे कोतुक केले. तसेच येथील हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना एक खास टास्कदेखील दिला. 

मोदी म्हणाले, AMUला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. अशात शंभर हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी काही संशोधन करावे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना, अशा स्वतंत्र्यता सेनानींवर संशोधन करा, ज्यांच्याविषयी समाजात फारशी माहिती नाही. यात 75 आदिवासी स्वतंत्रता सेनानी, तर 25 महिला स्वतंत्रता सेनानींची माहिती एकत्रित करावी. तसेच पुरातन पांडुलिपीदेखील डिजिटल माध्यमाने जगासमोर आणावी, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

2047 पर्यंतचा काळ अत्यंत महत्वाचा -मोदी म्हणाले, 1920मध्ये तेव्हाच्या तरुणांनी एक लक्ष्य समोर ठेवले होते, तेव्हा 1947ला देश स्वतंत्र्य झाला. मात्र, 2020 पासून 2047 पर्यंतचा काळ आता अत्यंत महत्वाचा आहे.  कारण आता देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहे.

आता वेळ वाया न घालता लक्ष्य गाठायचे आहे -आपण जेव्हा एक लक्ष्य साध्य करण्यासाठी पुढे पाऊल टाकू, तेव्हा काही लोक असेही असतात, की ज्यांना याचा त्रास होतो. असे लोक सर्वच समाजात असतात. मात्र, त्यांना बाजूला सारून आपल्याला देशासाठी कार्य करायला हवे. गेल्या शतकात मतभेदाच्या नावाखाली मोठा वेळ वाया गेला आहे. मात्र, आता वेळ वाया न घालता आपल्याला आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठायचे आहे, असे मोदी म्हणाले.

कोरोना काळात AMUने केली मदत -पंतप्रधान मोदी म्हणाले, AMUच्या भिंतींमध्ये देशाचा इतिहास आहे. येथून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी जग भरात देशाची मान उंचावत आहेत. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसोबत अनेक वेळा देशाबाहेर भेटण्याचा प्रसंगही आला आहे, जे नेहमीच आनंदी आणि शेर-ओ-शायरीच्या अंदाजात दिसतात. AMUने कोरोनाकाळात समाजाची मोठी मदत केली आहे. मोफत चाचण्या करवल्या आहेत. प्लाझ्मा बँक तयार करण्यात आली. एवढेच नाही, तर पीएम केअर्स फंडात मोठे योगदानही केले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थीBJPभाजपा