शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीच्या बँक खात्यावरील रक्कम ३२ महिन्यांत गेली ७०० रुपयांवरून ७५ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:40 IST

मोलकरणीच्या बँक खात्यातील रक्कम ३२ महिन्यांत ७०० रुपयांवरून ७५ लाख रुपयांवर गेली, यावर कुणाचा विश्वास बसेल का? पण तसे घडले आहे खरे.

नवी दिल्ली : मोलकरणीच्या बँक खात्यातील रक्कम ३२ महिन्यांत ७०० रुपयांवरून ७५ लाख रुपयांवर गेली, यावर कुणाचा विश्वास बसेल का? पण तसे घडले आहे खरे. ही कोणती जादू झालेली नाही किंवा तिला लॉटरीही लागलेली नसून, एका सरकारी अधिकाऱ्याने आपला काळा पैसा लपवण्यासाठी तिच्या बँक खात्याचा वापर केल्याचे उघड झाले आहे.मोलकरीण सरिता आणि ए. के. यादव (पेट्रोलियम विस्फोटक व सुरक्षा संस्था, चेन्नईचे माजी मुख्य नियंत्रक) यांच्याविरुद्ध अवैध मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नाच्या सुमारे ३११.३ टक्के अधिक आहे.सीबीआयच्या अधिकाºयाने सांगितले की, या प्रकरणात टीव्हीके कुमारसेन याचीही भूमिका संशयास्पद असून, त्याने यादव यांच्या एजंटच्या रूपात काम केले आहे. त्याचे नावही गुन्ह्यांत नोंदवण्यात आले आहे.सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे की, यादव यांनी १२ आॅगस्ट २०१५ ते ७ एप्रिल २०१८ या कालावधीत चेन्नईच्या विस्फोटक विभागात संयुक्त मुख्य नियंत्रकाच्या कारकीर्दीत अवैध संपत्ती मिळवली. २०१५ ते २०१८ या कालावधीत त्यांनी आपल्या बँक खात्याबरोबरच मोलकरीण सरिताच्या नावावर १.३७ कोटी रुपयांची संपत्ती जमा केली.सीबीआयच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आलेल्या आहेत. त्यानुसार, सरिताकडे २०१८ मध्ये ४४.३५ लाखांची अचल व ३०.९४ रुपयांची चल संपत्ती होती. यादव चेन्नईच्या कार्यालयात आले तेव्हा २०१५ मध्ये सरिताच्या खात्यावर केवळ ७०० रुपये होते. यादव यांनी काळा पैसा सरिताच्या नावावर ठेवला, असा अधिकाऱ्यांना संशय आहे. यादव हे सरिताला महिना ८,३०० पगार देत होते. २०१५ ते २०१८ या कालावधीत ही रक्कम २.६६ लाख रुपये होते. यादव यांनी काही रक्कम आपल्या पत्नीच्या नावावरही जमा केली आहे.>मोलकरीण आहेएवढी श्रीमंत...सरिताच्या नावावर २९.५० लाख रुपयांचे दोन प्लॉटस् आहेत. तसेच ३६ लाख रुपयांचे एक घर, १०.९४ लाख रुपयांचे ५४७ ग्रॅम दागिने, ६५,१३५ लाख रुपयांची एक स्कूटर व ६.७० लाखांच्या प्रॉमिसरी नोटस व बँकेतील रक्कम तिच्या नावावर जमा आहे.