शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 11:22 IST

गेल्या 19 दिवसांत डिझेलच्या किंमतीमध्ये 10.62 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 8.66 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. 

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. सलग 19व्या दिवशी या किमती वाढल्या आणि इतिहासात पहिल्यांदा डिझेलची किंमत ही पेट्रोलपेक्षा अधिक झाली आहे. डिसेलच 0.14 पैशांनी वाढून 80.02 प्रति लिटर झाले आहे. पेट्रोलची किंमत 0.16 पैशांनी वाढून 79.92 रुपये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन हे ट्रोल होत आहे. त्यांनी 2012मध्ये केलेले एक ट्विट नेटिझन्सनी व्हायरल केलं असून बिग बींना पुन्हा तसं ट्विट करण्याची विनंती केली जात आहे.

2012वर्षाच्या अखेरपर्यंत डिझेलची किंमत ही पेट्रोलच्या किंमतीपेक्षा कमी होती. 2002 ते 2012 पर्यंत पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत तफावत होती. आता पेट्रोल 80 रुपयांच्या घरात, तर डिझेल 80 पार गेले आहे.  2012मध्ये बच्चन यांनी पेट्रोलची किंमत 8 रुपयांनी वाढल्यानंतर एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की,''पेट्रोल 7.5रुपयांनी महागलं. पेट्रोल पंपवरील कर्मचारी- कितने का डालू? मुंबईकर - 2.4 रुपयांच्या पेट्रोलनं कारवर स्प्रे करून टाक भावा, कार पेटवायची आहे.'' आता 8 वर्षानंतर नेटिझन्सनी बिग बींना ट्रोल केले आहे आणि पुन्हा असं ट्विट करण्याची मागणी केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (Petrol-Diesel price today) पार उतरलेल्या असताना भारतात मात्र पेट्रोलपेक्षाडिझेलच्या किंमती नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. काल देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षाडिझेलचे दर जास्त झालेले असताना आजचा विक्रमही न भूतो असाच आहे. देशात सलग 19 दिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.  

रोज 50 ते 60 पैशांनी वाढणाऱ्या इंधनाच्या दराने आज काहीसा दिलासा दिला. आज डिझेलमध्ये 14 पैसे आणि पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली. देशात इंधनाचे सर्वात कमी दर हे आधी दिल्लीमध्ये होते. मात्र, आता त्याच्या उलट झाले आहे. देशात सर्वाधिक दर आता दिल्लीमध्ये आहेत. आज दिल्लीमध्ये डिझेलची किंमत 79.88 रुपयांनी वाढून 80.02 रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर 86.70 आमि डिझेल 78.34 रुपये झाला आहे. यानंतर चेन्नईमध्ये डिझेल 77.29 रुपये झाला आहे.  

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनPetrolपेट्रोलDieselडिझेल