शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांनी आपलं जुनं घर 'सोपान' विकलं, झाली कोट्यवधींची डील! जाणून घ्या किती आली किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:00 IST

गुलमोहर पार्कमधील हे दोन मजली घर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे पहिले घर असल्याचे बोलले जाते.

नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी दक्षिण दिल्लीतील गुलमोहल पार्कमध्ये असलेले आपले 'सोपान' नावाचे घर विकले आहे. या डीलमधून त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. त्यांनी हे घर जवळपास 23 कोटी रुपयांना विकल्याचे बोलले जाते. या घरात अमिताभ यांच्या आई तेजी बच्चन आणि वडील हरिवंशराय बच्चन राहत होते.

गेल्या वर्षीच झाले होते रजिस्ट्रेशन -Nezone ग्रुपचे सीईओ अवनी बदेर (Avni Bader) यांनी अमिताभ यांच्या या प्रॉप्रटीची खरेदी केली आहे. ते बच्चन कुटुंबीयांना गेल्या 35 वर्षांपासून ओळखतात. तसेच ते याच भागात राहतात. Economic Times नुसार, 418 चौरस मीटर एवढ्या विस्तिर्ण जागेवर असलेल्या या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन गेल्यावर्षी 7 डिसेंबरला झाले होते.

ब्लॉगमध्ये अनेक वेळा केला 'सोपान'चा उल्लेख -अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये 'सोपान'चा उल्लेख अनेक वेळा केला, हे घर त्यांच्या आई तेजी यांच्या नावावर होते. इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना अवनी यांनी सांगितले की, हे जुने बांधकाम आहे, आता आम्ही हे पाडून आमच्या गरजेनुसार बांधकाम करू. या भागात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राहतो. आम्ही बऱ्याच दिवसांपासून एका नव्या प्रॉपर्टीच्या शोधत होतो आणि जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळाली तेव्हा आम्ही लगेच हो म्हटले.

अमिताभ बच्चन यांचं पहिलं घर! -गुलमोहर पार्कमधील हे दोन मजली घर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे पहिले घर असल्याचे बोलले जाते. माध्यमांतील वृत्तानुसार, अमिताभ बच्चन मुंबई शिफ्ट होण्यापूर्वी आई-वडिलांसह याच घरात राहत होते. यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईला शिफ्ट झाले. यामुळे हे घर गेल्या अनेक वर्षांपासून रिकामेच होते.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनHomeसुंदर गृहनियोजनdelhiदिल्ली