शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह आज बोलणार; भाजपने १६ नेत्यांना मैदानात उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 05:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने या चर्चेचा समारोप होईल.

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूरच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संसदेत उत्तर देण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांना पंतप्रधानांच्या आधी आज, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसंसदेत मणिपूरबाबत उत्तर देणार आहेत. अमित शाह यांचे उत्तर काँग्रेसला महागात पडणार असून, त्यांनी मणिपूरच्या घटनांबाबत काँग्रेसच्या माजी सरकारांना जबाबदार ठरवले आहे.

संसद अधिवेशनाआधीपासूनच मणिपूरच्या घटनेबाबत पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी विरोधक करीत आहेत. हे निवेदन न आल्यामुळे पंतप्रधानांनी याबाबत बोलावे यासाठी अंतिम शस्त्र म्हणून विरोधकांनी संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान मोदी लोकसभेत या प्रस्तावाला उद्या, गुरुवारी दुपारी चार वाजता उत्तर देणार आहेत. परंतु, पंतप्रधानांच्या आधी मणिपूरच्या संपूर्ण घटनाक्रमावर अमित शाह अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बुधवारी बोलणार आहेत. त्यांचे उद्याचे निवेदन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

जोरदार तयारीमणिपूरबाबतच्या तयारीसाठी आजही अमित शाह यांनी मणिपूरच्या नेत्यांना संसद भवनातील आपल्या कक्षात बोलावले होते. मणिपूर सरकारच्या काही मंत्र्यांनाही दिल्लीत बोलावले होते. 

तीन दिवस, १७ तास चालणाऱ्या या अविश्वास प्रस्तावावर बोलण्यासाठी सत्ताधारी भाजपने आपल्या १६ नेत्यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजीजू, भाजप सरचिटणीस बंदी संजय, भाजप खा. लॉकेट चटर्जी, राम कृपाल यादव, राजदीप राय, विजय बघेल, रमेश विधुरी, सुनीता दुग्गल, हीना गावित, निशिकांत दुबे, राज्यवर्धन सिंह राठौर यांचा समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने या चर्चेचा समारोप होईल.

सीएम कार्यालयातून फोन...मणिपूरची परिस्थिती अमली पदार्थावरून निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री सांगतात; परंतु, ड्रगमाफियाला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच त्याच्या सुटकेसाठी निरोप येतो, असा आरोप काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदNo Confidence motionअविश्वास ठराव