जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या निराशाजनक कामगिरीमुळे संतप्त झालेले पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी संबंधित राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना या पोटनिवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या पराभवाबाबत विस्तृत अहवाल मागितला आहे.
भाजपाच्या सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या दौ:यावरून परतल्यानंतर शाह या राज्यांमधील प्रदेश नेतृत्व आणि त्या राज्यात पक्षाचे सरकार असले तर मुख्यमंत्री आणि संबंधित राज्यांच्या केंद्रीय प्रभारींसमवेत एक बैठक घेऊन या पोटनिवडणुकीच्या निकालांची समीक्षा करणार आहेत. शाह 19 सप्टेंबरला दिल्लीत परत येतील. याआधीही उत्तराखंड आणि बिहारमधील पोटनिडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर शाह यांनी दोन्ही राज्यांच्या नेत्यांना दिल्लीत बोलावून त्यांचा ‘क्लास’ घेतला होता.
दरम्यान या पोटनिवडणुकीतील पराभवावर भाजपा नेते वेगवेगळे भाष्य करीत आहेत. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षनेतृत्वाचा अहंकार वाढला होता. त्याला धक्का बसणो आवश्यक होते. पोटनिवडणुकीतील पराभवामागे पक्ष कार्यकत्र्याची उदासीनता हे मुख्य कारण आहे. अलीकडच्या काळात दिल्लीतील भाजपा मुख्यालय पक्ष कार्यालयापेक्षा कार्पोरेट घराण्याच्या कार्यालयासारखे दिसत आहे. तेथे कोणत्याही नेत्याला आणि पदाधिका:याला भेटणो कठीण झाले आहे.
काही भाजप नेते दबक्या आवाजात अमित शाह यांनाच या पराभवासाठी जबाबदार धरत आहेत. त्यांच्या मते, शाह यांनी खासदार योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमधील प्रचाराची जबाबदारी दिली होती. त्यामुळे भाजपाचे दुसरे नेते नाखूश होते. दुसरीकडे, बसपाने उमेदवार उभा न केल्याने त्याचा थेट फायदा सपाला झाल्याचे भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना वाटते. राजस्थानमधील निकाल धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. आदित्यनाथ यांना स्टार प्रचारक बनविल्याने आणि त्यांनी सांप्रदायिक विष पेरल्याने तसेच लव्ह जिहादला मुद्दा बनविल्याने भाजपाचा पराभव झाला, हे त्रिवेदी यांना मान्य नाही. याचा परिणाम महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूक निकालांवर होणार नाही, असे ते म्हणाले.