शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या संपत्तीत 300 टक्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 07:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू साथीदार आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या संपत्तीत तब्बल 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शहांची संपत्ती 25 कोटी रूपयांनी वाढली आहे.

ठळक मुद्दे2012 नंतर अमित शहांच्या संपत्तीत 300 टक्यांनी वाढ.राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले

ऑनलाइन लोकमतसुरत, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू साथीदार आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या संपत्तीत तब्बल 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शहांची संपत्ती 25 कोटी रूपयांनी वाढली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आणि अमित शहा राष्ट्रीय राजकारणात चर्चेमध्ये आले.राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. गुजरातमधून राज्यसभेसाठी अमित शहा, स्मृती इराणी, बलवंतसिंह राजपूत आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञपत्रात सर्वच उमेदवारांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. यात ही माहिती समोर आली आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शहा दाम्पत्याकडे 2012 मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 8 कोटी 54 लाख रुपयांची संपत्ती होती. जी 2017 मध्ये 34 कोटी 31 लाखांवर पोहोचली आहे. एकूण संपत्तीमध्ये जंगल मालमत्ता 1 कोटी 91 लाख रुपयांवरुन 19 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. शहा दाम्पत्याच्या मालमत्तेमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

अमित शहा यांनी वार्षिक उत्पन्नापोटी 1 कोटी 49 लाख रूपयांची मिळकत दाखवली आहे. दरम्यान, फेब्रुवारी 2013मध्ये मातोश्रींच्या निधनानंतर अमित शहा यांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचाही समावेश झाला. म्हणूनच ही वाढ दिसते असे सूत्रांचे म्हणणे आहे.गुजरातमधून राज्यसभेवर ११ सदस्य असून त्यातील इराणी, दिलीपभाई पंड्या (दोघेही भाजपा) आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांची मुदत १८ आॅगस्ट रोजी संपत आहे. त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली असून बुधवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार विकत घेण्यासाठी भाजपाने घोडेबाजार मांडला असून, कोट्यवधी रुपये आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.दरम्यान, गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 40 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या 40 आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.