शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 12:09 IST

शहा यांच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. हुर्रियत कॉन्फेरन्सच्या सैय्यद अली शाह गिलानी असो वा मीरवाईज उमर फारुक कोणत्याही संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं नाही

जम्मू - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या दोन दिवसाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांनी बंद पुकारला नाही असं घडलं आहे. मागील तीन दशकात काश्मीरमध्ये कोणत्याही गृहमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी दहशतवाद्यांकडून बंद पुकारण्याचं आवाहन केलं गेलं नाही. गृहमंत्री झाल्यानंतर अमित शहा श्रीनगर येथे पोहचले. या दौऱ्यावेळी अमित शहा यांनी सुरक्षा आणि विकास या दोन्ही मुद्द्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

दौऱ्यादरम्यान अमित शहा यांच्याकडून अमरनाथ यात्रादेखील करण्यात येणार आहे. काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकी, लोकप्रतिनिधी आणि पंचायत सदस्यांसोबतही त्यांची बैठक होणार आहे. तसेच राज्यपाल सत्यपाल मलिक यांचीदेखील ते भेट घेणार आहेत. सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेतलेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाला दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई सुरुच ठेवण्याचे आदेश दिले. तसेत अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी घातपात कारवाया करण्याची शक्यता असल्याने योग्य तो पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी लावण्यात यावी अशा सूचना शहा यांनी सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

शहा यांच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. हुर्रियत कॉन्फेरन्सच्या सैय्यद अली शाह गिलानी असो वा मीरवाईज उमर फारुक कोणत्याही संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं नाही. तसेच दहशतवादी संघटनांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मागील तीन दशकांपासून केंद्र सरकारमधील कोणीही प्रतिनिधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आल्यानंतर फुटिरतावादी गटांकडून काश्मीर खोऱ्यात बंद पुकारण्यात येत होता.

3 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर खोऱ्यात दौरा केला. त्यावेळी गिलानी, मीरवाइज आणि जेकेएलएफचा मुख्य यासीन मलिक यांच्या संघटनेकडून बंद पुकारण्यात आला. तर 10 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काश्मीर दौरा करण्यात आला. तेव्हाही जेआरएल या संघटनेकडून काश्मीर खोऱ्यात बंद पुकारण्यात आला होता. मात्र अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी असं काहीच घडलं नाही.  

 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी