शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुने हिशेब चुकते करण्यासाठी अमित शहांनी प्रतिष्ठेची केली निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:09 IST

गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोघांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीला व्यक्तीगत संघर्षाची किनार आहे.

ठळक मुद्देअहमद पटेल यांना काँग्रेसचे चाणक्य म्हटले जाते.केंद्रात काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता असताना अमित शहा यांच्यावर खटले दाखल झाले.

सूरत, दि. 8 - गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोघांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीला व्यक्तीगत संघर्षाची किनार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांच्याबरोबरच काही जुने हिशेब चुकते करण्याची संधी साधली आहे. अहमद पटेल यांना काँग्रेसचे चाणक्य म्हटले जाते. अमित शहा यांचे सुद्धा आज भाजपामध्येच तेच स्थान आहे. त्यामुळे या निवडणुकीचा जो काय निकाल लागेल त्याचा सहाजिकच दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेवर परिणाम होईल. 

केंद्रात काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता असताना अमित शहा यांच्यावर खटले दाखल झाले. प्रामुख्याने सोहराबुद्दीन शेख, इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण शहा यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लावण्यात आला. शहा यांना एकवर्षासाठी गुजरातमधून तडीपारही व्हावे लागले. शहा यांना ज्या प्रकारे गोवण्यात आलं त्यामध्ये अहमद पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि गुजरात काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी भाजपाच्या पथ्यावर पडली आहे. 

त्यामुळे  राजकीय संधी साधण्यात अत्यंत वाकबगार असलेल्या शहा यांनी यानिमित्ताने अहमद पटेल यांची पुरती कोंडी केली आहे. काँग्रेससाठी प्रत्येक मत महत्वाचे झाले असून एक-एक  मत मिळवण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागत आहे. अहमद पटेल हे काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अशी त्यांची ओळख आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक आणि विविध राज्यातील सत्तास्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनिती आहे. 

अहमद पटेल यांची राज्यसभेसाठीची ही पाचवी टर्म असून, ते 1992 पासून ते काँग्रेसच्या सर्वोच्च समितीचे सदस्य आहेत. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यानंतर अहमद पटेल तिस-या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जातात. 

दोन पक्षांचे अध्यक्ष दोन सभागृहांमध्येगुजरात राज्यसभा निवडणुकांमुळे आणखी एक नवी घटना घडणार आहे. भाजपाचे अमित शहा राज्यसभेत निवडून जातील. तिकडे लोकसभेत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून गेलेल्या आहेत. त्यामुळे देशातील दोन प्रमुख पक्षांचे अध्यक्ष संसदेच्या दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये दिसून येतील.