शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

अमित शहांना बोलूच दिले नाही,राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 05:40 IST

आसामच्या नॅशनल सिटिझन्स रजिस्टरच्या मुद्द्यावर दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांचे आक्रमक भाषण राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ करून ते हाणून पाडले.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : आसामच्या नॅशनल सिटिझन्स रजिस्टरच्या मुद्द्यावर दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांचे आक्रमक भाषण राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ करून ते हाणून पाडले, तर गुरूवारीही खरीप पिकांच्या हमीभावावर अमित शहांना बोलू द्यायचे नाही, असा निर्धार विरोधकांनी केल्याचे दिसले. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा तुम्हाला नको आहे काय? असा सवाल विचारीत सभापती व्यंकय्या नायडूंनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.खरीप पिकांच्या हमीभावाच्या मुद्द्यावर आज चर्चा होणार होती. शिवायलोकसभेत मंजूर झालेले १२ वर्षांखालील बालिकांवरील बलात्काºयांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे दुरुस्ती विधेयक चर्चेसाठी येणार होते. शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित विधेयकही मंजुरीच्या प्रतिक्षेत होते.दुपारी सभापतींनी खरीप पिकांच्या हमीभावाचा विषय पुकारला. अमित शहा बोलायला उभे रहाणार तोच तृणमूलचे डेरेक ओब्रायन व अन्य विरोधकांनी आसामच्या नॅशनल सिटिझन्स रजिस्टरचीअर्धवट राहिलेली चर्चा पूर्ण करा, गृहमंत्र्यांचे उत्तर आम्हाला ऐकायचे आहे, अशी मागणी करीत पुन्हा गोंधळ घातला.त्यावर आसामवर चर्चा झाली आहे . पुन्हा चर्चा होणार नाही, असे सभापतींचे उत्तर ऐकताच शरद पवार म्हणाले की, आसामचा विषय संवेदनशील असून, गृहमंत्र्यांचेनिवेदन आवश्यक आहे. ते ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही आसामची चर्चा आम्हाला ऐकायची आहे, असा आग्रह धरला.उपसभापतीपदी कहकशा परवीन?राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू प्रश्नोत्तराच्या तासाचे काम अन्य कोणावर सोपवत नाहीत. पण गुरुवारी सभापतींनी संयुक्त जनता दलाच्या श्रीमती कहकशा परवीन यांच्याकडे प्रश्नोत्तराच्या तासाची जबाबदारी सोपवताच, त्या सत्ताधारी आघाडीतर्फे उपसभापतीपदाच्या भावी उमेदवार असल्याची कुजबूज सुरू झाली.सभापती म्हणाले की, ‘आज मी नवा प्रयोग करणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज श्रीमती कहकशा परवीन यांच्याकडे सोपवणार आहे. कहकशा चा अर्थ तारांगण. सर्वांचे त्यांनायोग्य ते सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. भागलपूरचे एके काळी महापौरपद सांभाळणाºया कहकशा परवीन यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यापूर्वी बिहार महिला आयोगाचे अध्यक्ष होत्या.

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसद