शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- वादग्रस्त राफेल विमानांचे अखेर 'भारतात लँडिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 22:16 IST

एयरो इंडिया या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी राफेल विमानं भारतात दाखल झाली आहेत. या प्रदर्शनात एकूण तीन राफेल विमानं सहभाग घेणार आहेत.

बंगळुरू- राफेल विमान प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही राफेल विमान करारावरून मोदींना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. फ्रान्सबरोबर 36 लढाऊ विमान खरेदीचा करार करण्यात आला होता, त्यातील दोन विमानं भारतातल्या बंगळुरू विमानतळावर उतरली आहेत. ही दोन्ही विमानं एयरो इंडिया या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाली आहेत. या प्रदर्शनात एकूण तीन राफेल विमानं सहभाग घेणार आहेत.भारतात पोहोचलेले राफेल विमान हे फ्रान्सच्या हवाई दलातील आहेत. एअरो इंडियाचं प्रदर्शन 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूत आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात जवळपास 57 एअरक्राफ्ट सहभागी होणार आहेत. त्यासाठी फ्रान्सच्या हवाई दलानं तीन राफेल विमानं भारतात पाठवली आहेत. यातील दोन विमानं बुधवारी भारतात पोहोचली असून, तर तिसरं विमान प्रदर्शनाच्या दिवशी पोहोचणार आहे. हवाई दलाचे डिप्‍टी चीफ एअर मार्शल विवेक चौधरीसुद्धा राफेलची विमानं उडवणार आहेत. दरम्यान, भारतीय हवाईदलासाठी दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा फ्रेंच सरकारशी करार झाला आहे. हा सौदा मोदी सरकारने फ्रान्सच्या सरकारशी आरंभी केला तेव्हा त्यात कुणीही मध्यस्थ नव्हता. त्या वेळी ही विमाने देशाला प्रत्येकी 500 कोटी रुपयांना मिळणार होती.अंबानींचा त्यात शिरकाव झाल्यानंतर त्यांची प्रत्येकी किंमत 1600 कोटी रुपये झाली आहे. पूर्वी 126 विमानांसाठी झालेला हा सौदाही आता 36 विमानांवर आला आहे. ही विमाने संरक्षण खात्याची गरज म्हणून विकत घेण्याचा व्यवहार मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री असताना झाला. आता त्यांची जागा निर्मला सीतारामन यांनी घेतली आहे. याच काळात या विमानांच्या किमती तीनपटींहून अधिक वाढल्याचे व त्यांची संख्या कमी झाल्याचे देशाला कळले आहे. भारतातील हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या झपाट्याने कमी होत असताना उच्च तंत्रज्ञानावर आधारित लढाऊ विमानांची देशाला गरज आहे. देशाला 150 विमानांची आवश्यकता आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील