शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

'गदर... एक देशप्रेमकथा'; अमेरिकेतील शाळांच्या पाठ्यपुस्तकात भारतीय स्वातंत्र्याचा धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:46 PM

अमेरिकेतील विद्यार्थ्यांना मिळणार भारतीय इतिहासाची माहिती

नवी दिल्ली: अमेरिकेतील शाळांच्या पुस्तकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील घटनांचा समावेश केला जाणार आहे. अमेरिकेच्या अॅस्टोरिया शहरात झालेल्या एका कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. गदर पक्षाशी संबंधित इतिहास अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवण्यात येईल, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गदर पक्षाच्या स्थापनेला 105 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ओरेगनमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी गदर पक्षानं केली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाविरोधात सशस्त्र संघर्ष करण्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली होती. कॅनडा आणि अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी 1913 मध्ये गदर पक्षाची स्थापना केली होती. सरदार सोहन सिंह भाकना यांनी या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाचं मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होतं. 21 एप्रिल 1913 रोजी अमेरिकेत गदर पक्षानं 'गदर' नावाचं साप्ताहिक सुरु केलं होतं. याची जबाबदारी करतार सिंह सराभा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या साप्ताहिकात देशभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या कविता प्रसिद्ध व्हायच्या. लाला हरदयाल यांच्या विचारांनी गदर पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या विस्तारासाठी ते अमेरिकेला गेले होते. अमेरिकेतील भारतीयांना पक्षाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं. इंग्रजांविरोधात बंड करण्यासाठी गदर पक्षानं 21 फेब्रुवारी 1915 हा दिवस निश्चित केला होता. मात्र किरपाल सिंह यांनी गद्दारी करुन याबद्दलची माहिती ब्रिटिशांना दिली. याची कल्पना क्रांतीकारकांना मिळताच त्यांनी बंडाची तारीख 19 फेब्रुवारी केली. मात्र याचीही माहिती इंग्रजांपर्यंत पोहोचल्यानं क्रांतीकारकांची धरपकड करण्यात आली.  

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिका