शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Corona Vaccine: आता भारतात होणार जॉन्सन अँड जॉन्सन लसीचं उत्पादन!; चाचपणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 17:51 IST

Corona Vaccine: केवळ एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचं उत्पादन भारतात करण्यासंदर्भात चाचपणी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देआता भारतात होणार जॉन्सन अँड जॉन्सन लसीचं उत्पादनअमेरिकेने सुरू केली चाचपणीभारतातील लस उत्पादनात गुंतवणूक करण्याचा विचार

नवी दिल्ली: देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढत दिसून येत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या उच्चांक गाठत आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र, लसींचा तुटवडा लसीकरण मोहिमेवर परिणाम करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केवळ एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचं उत्पादन भारतात करण्यासंदर्भात चाचपणी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. (america looking to jointly produce Johnson and Johnson single dose corona vaccine in India) 

जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीच्या वापराला अलीकडेच अमेरिकेत मंजुरी मिळाली आहे. या लसीचे भारतात उत्पादन करण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे गृहसचिन डॅनियल स्मिथ यांनी यासंदर्भात बोलताना दिली. भारतातील लस उत्पादक आणि अमेरिकी कंपन्या यांच्यामार्फत संयुक्तपणे या लसीचे उत्पादन करता येणं शक्य आहे का, याबाबत चाचपणी सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचे उत्पादन भारतात सुरू झाल्यास भारताला आणखी एक लस उपलब्ध होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. 

ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका

भारतातील लस उत्पादनात गुंतवणूक करण्याचा विचार

अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन भारतातील लस उत्पादनात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.  जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीच्या उत्पादनासाठी या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवणूक होण्याची शक्यता असून, भारतातील खासगी क्षेत्रामधील कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. यामुळे लसीचे उत्पादन वेगाने करता येणे शक्य होऊ शकेल. यामुळे सन २०२२ च्या अखेरपर्यंत भारतात १०० कोटी लसींच्या डोसचे उत्पादन होऊ शकेल, असा विश्वास स्मिथ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

भारत सरकारने कच्च्या मालाची यादी दिली

भारत सरकारने कच्च्या मालाची यादी दिली आहे. अमेरिका या मालाचा आणि इतर साधनांचा पुरवठा तातडीने करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, जागतिक स्तरावरच कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारताला कच्चा माल पुरवणे सोपी बाब राहिलेली नाही. आम्ही भारतासोबत या यादीवर काम करत आहोत. आमच्याकडे काय उपलब्ध आहे, काय आम्ही पुरवू शकतो आणि किती वेगाने त्याचा पुरवठा करता येऊ शकेल, यावर आम्ही काम सुरू आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्याची समस्या जगातील सर्वच लसींच्या बाबतीत आहे, असे स्मिथ यांनी नमूद केले.

मस्तच! आता घरबसल्या सेट करा ATM कार्डचा नवीन पिन; ‘या’ बँकेची विशेष सुविधा

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४८ हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत ३ लाख ५५ हजार ३३८ जणांनी करोनावर मात केली. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच देशात आताच्या घडीला ३७ लाख ०४ हजार ०९९ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर, १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका