शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

“ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील, त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 08:24 IST

उद्धव ठाकरे गटाची जोरदार टीका.

‘पंतप्रधान मोदी यांचे सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्ताने केलेले भाषण भ्रष्टाचार मोडून काढणारे नसून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन देणारे आहे. भाजप तुमच्या पाठीशी आहे, आमच्या विरोधकांना सोडू नका, असा संदेश देणारे आहे,’ असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

‘सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणांची प्रतिष्ठा मागील सात-आठ वर्षांत साफ धुळीस मिळाली आहे व त्या यंत्रणांना स्वच्छ करणारे वॉशिंग मशीन अद्यापि निर्माण व्हायचे आहे. मोदी यांच्या भाषणांमुळे अदानी वगैरे भाजप मंडळींचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. कारवाया व अटका टाळण्यासाठी भ्रष्टाचारी मंडळी भाजपात प्रवेश करतात याचे मोदींना कौतुक वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील,’ असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीकेचा बाण सोडलाय.

काय म्हटलेय संपादकीयमध्ये ?‘अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री वगैरे करण्याचे काम करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे होते. संदेश स्पष्ट आहे. भ्रष्टाचारी फक्त भाजपातच राहतील व त्यांना अभय मिळेल,’ असे संपादकीयमध्ये म्हटले आहे.

सीबीआय म्हणजे मोदी-शहांच्या पिंजऱ्यातला पोपट‘देशात आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नाही. भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी तिच्या विरोधात न घाबरता कारवाई करा,’ अशा सूचना मोदी यांनी दिल्या आहेत. कोणत्याही भ्रष्टाचाऱयाला वाचवू नका आणि पाठीशीही घालू नका, असे मोदी म्हणत असले तरी सीबीआय म्हणजे मोदी-शहांच्या पिंजऱ्यातला पोपट आहे याबाबत कुणाच्याही मनात शंका नसावी,’ असे यात नमूद केलेय.

आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली ‘एकेकाळी सीबीआय म्हणजे ‘काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली व सीबीआयचा पोपट पिंजऱ्यातच मालक सांगेल त्याप्रमाणे ‘विटू विटू’ किंवा ‘मिठू मिठू’ करीत आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा आज मोदींच्या ढवळय़ा-पवळ्याप्रमाणेच काम करत असल्याचा आरोप यात करण्यात आलाय.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUddhav Thackerayउद्धव ठाकरे