शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने आजारी आईला हातगाडीवरून रुग्णालयात घेऊन गेला लेक पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 20:10 IST

रुग्णवाहिका आणि उपचार वेळेवर मिळाले असते तर आईचा मृत्यू झाला नसता, मात्र रुग्णवाहिका नसल्यामुळे तिच्या आजारी आईला जीव गमवावा लागला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका न मिळाल्याने एका मुलावर त्याच्या आजारी आईला हातगाडीवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगा आजारी वृद्ध आईला हातगाडीवर ठेवून 4 किमी अंतर पायी प्रवास करत रुग्णालयात पोहोचला, पण तोपर्यंत आईचा मृत्यू झाला होता. रुग्णवाहिका आणि उपचार वेळेवर मिळाले असते तर आईचा मृत्यू झाला नसता, मात्र रुग्णवाहिका नसल्यामुळे तिच्या आजारी आईला जीव गमवावा लागला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलालाबाद शहरात ही भयंकर घटना घ़डली. याच ठिकाणी राहणाऱ्या दिनेश याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची वृद्ध आई बिना देवी यांच्या अचानक पोटात दुखू लागले. दिनेशच्या फोनमध्ये बॅलन्स नव्हता. त्याने शेजाऱ्यांना विनंती करून 108 नंबरवर फोन करून रुग्णवाहिकेला बोलवण्याची विनंती केली, मात्र कोणीही फोन केला नाही.

दिनेशकडे पैसेही नव्हते. त्याच्या आईला खूप वेदना होत होत्या. त्यामुळे त्याने आईला हातगाडीवरून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. 4 किलोमीटर चालत तो रुग्णालयात पोहोचला, मात्र रस्त्यातच त्याच्या वृद्ध आईचा मृत्यू झाला.

आईला हातगाडीवर चढवून तब्बल 4 किलोमीटरचा प्रवास करून तो जलालाबादच्या शासकीय रुग्णालयात पोहोचला, मात्र याच दरम्यान त्याच्या आईचा रस्त्यात मृत्यू झाला. रुग्णालयाचे डॉक्टर अमित यादव यांनी हातगाडीवर असलेल्या आईला पाहिले पण वाटेतच आईचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश