शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video - संतापजनक! फक्त 1000 रुपयांसाठी रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 08:23 IST

Video - फक्त 1000 रुपयांसाठी या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. फक्त 1000 रुपयांसाठी या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. महिला वेदनेने कळवळत होती पण तरीही कोणतंही वाहन तिच्या मदतीसाठी थांबलं नाहीय या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये पंधरी गावातील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. एका गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यासाठी रुग्णवाहिका देखील बोलावण्यात आली. पण जेव्हा रुग्णवाहिकेच्या चालकाला महिलेच्या नातेवाईकांमकडे पैसे नसल्याचं कळलं तेव्हा त्याने रस्त्यातच गर्भवती आणि तिच्या काही नातेवाईकांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवलं. एका हजार रुपयांसाठी ही घटना घडली. 

राजेश साहू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. रुग्णवाहिका चालकाने महिलेच्या कुटुंबाकडे 1000 रुपये मागितले. तरच रुग्णालयात पोहोचवू असं सांगितलं. पण कुटुंबाकडे तितके पैसे नव्हते, त्यामुळे ते चालकाला तितके पैसे देऊ शकले नाही. म्हणून त्याने महिलेला रस्त्यात सोडलं आणि तो तिथून निघून गेला.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला एक गर्भवती बसलेली असल्याचं दिसतं आहे. तिला प्रसूती वेदना होत आहेत. तिचे नातेवाईक तिला आधार देताना दिसत आहेत. तर पुढे एक रुग्णवाहिका तिथून जाताना दिसते आहे.  हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशpregnant womanगर्भवती महिला