शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथांना मिळणार दलित मित्र पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 08:58 IST

आमच्या संघटनेला कोणतीही राजकीय संघटना निधी पुरवत नाही.

लखनऊ: उत्तर प्रदेशातील आंबेडकर महासभा या संघटनेकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दलित मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. आंबेडकर महासभेकडून पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष लालजी निर्मल यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, या पुरस्कारासाठी योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यामागे अनेक कारणे आहेत. हे पहिले सरकार आहे की ज्यांनी उत्तर प्रदेशातील प्रत्येक सरकारी कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्याचा आदेश दिला. तसेच योगी सरकारने विधानसभेत मागासलेल्या घटकांना आरक्षण देण्याचीही घोषणा केली. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन त्यांना दलित मित्र पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लालजी निर्मल यांनी सांगितले. मात्र, योगी आदित्यनाथांना हा पुरस्कार देण्याच्या निर्णयावरून विरोधकांकडून टीकाही केली जात आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना लालजी निर्मल यांनी सांगितले की, आमच्या संघटनेला कोणतीही राजकीय संघटना निधी पुरवत नाही. त्यामुळे हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे लालजी यांनी सांगितले. भाजपा सरकारकडून यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मोठ्याप्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रत्येक जिल्ह्यात पदयात्राही काढल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दलित अत्याचार तसेच अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यानंतर देशभरात उसळलेला हिंसाचार यामुळे भारतीय जनता पक्षातील खासदार स्वत:च्याच पक्षावर नाराज आहेत. या खासदारांची नाराजी भारतीय जनता पक्षासाठी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपामधील श्रेष्ठींनी दलित खासदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित खासदारांशी संवाद साधणार आहेत.  तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती