शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राफेलच्या मुद्द्यावर पत्रप्रपंचानंतर अंबानींनी काँग्रेसला पाठवली कायदेशीर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 14:05 IST

राफेल प्रकरणावरून काँग्रेस आणि मोदी सरकारमधला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. परंतु या वादात अनिल अंबानींची सरशी होत असल्याचं पाहायला मिळतंय.

नवी दिल्ली- राफेल प्रकरणावरून काँग्रेस आणि मोदी सरकारमधला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. परंतु या वादात अनिल अंबानींची सरशी होत असल्याचं पाहायला मिळतंय. राफेलच्या मुद्द्यावरून अनिल अंबानी यांनी आतापर्यंत राहुल गांधींना दोन पत्र लिहिलं आहेत. तसेच या पत्रांतून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचं खंडनही करण्यात आलं आहे. तरीही काँग्रेस आणि राहुल गांधी राफेलच्या मुद्द्यावरून अंबानी आणि मोदींवर आरोप करत सुटले आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आता अनिल अंबानींनी काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अंबानींनी काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे. काँग्रेसनं बिनबुडाचे आरोप लावू नयेत. त्यांच्याकडे पुरावे असतील तरच बोलावे. तसेच काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चुकीची माहिती पसरवू नये.काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, अशोक चव्हाण, संजय निरुपम, अभिषेक मनू सिंघवी, इतर नेते आमच्या ग्रुपवर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे रिलायन्सनं याविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीसमध्ये लिहिलं आहे की, सर्व नेत्यांनी राइट टू फ्रीडम आहे. परंतु त्यांनी त्या अधिकाराचा जबाबदारीनं वापर केला पाहिजे. काँग्रेस पक्ष रिलायन्स ग्रुपविरोधात कॅम्पेन चालवत आहे. राफेलच्या मुद्द्यावर जयवीर शेरगिल हे भाजपा आणि सरकारला वारंवार घेरत आहेत. 

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानी