शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’मध्ये आता अ‍ॅमेझॉनही! भारतातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठ खुली होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 04:15 IST

जेफ बेझॉस; १0 अब्ज डॉलरच्या भारतीय वस्तूंची करणार निर्यात

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात आता अ‍ॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनीही सहभागी होणार असून, तिच्याद्वारे भारतातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठ खुली होणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये १0 अब्ज डॉलरच्या भारतीय उत्पादनांची निर्यात अ‍ॅमेझॉन करणार आहे.

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस सध्या भारतात असून, त्यांनी बुधवारी दिल्लीत उद्योजकांच्या परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, २0१५ पर्यंत आमची कंपनी १0 अब्ज डॉलरच्या भारतीय वस्तूंची निर्यात करेल. त्यासाठी भारतात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक अ‍ॅमेझॉन करेल. त्यांची पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी ही गुंतवणूक असली, तरी त्याचा फायदा लघू व मध्यम उद्योजकांनाही होईल, असे सांगून ते म्हणाले की, भारतातील लघू व मध्यम उद्योजकांना डिजिटल उपकरणांनी सज्ज केल्याचा फायदा आमच्याप्रमाणे त्यांनाही निश्चितपणे होईल.

ई-कॉमर्स कंपनीतील आपला अनुभव सांगताना बेझॉस म्हणाले की, सुरुवातीच्या काळात वस्तूंच्या पॅकिंगपासून त्या वस्तू ग्राहकांना घरी पोहोचविण्यापर्यंतचे काम आपण केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा, मागण्या व पुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच त्यांचा तत्पर पुरवठा करताना कंपन्यांना येणारे अडथळे याची कल्पना आहे. त्यामुळे या अडचणी भारतात येऊ नयेत, यासाठी अ‍ॅमेझॉन पूर्ण तयारी करीत आहे. जेफ बेझॉस यांनी दिल्लीत लहान मुलांसह पतंगही उडविले. त्यावेळी ते भलतेच खुशीत दिसत होते. पतंग उडवितानाचे छायाचित्र त्यांनी स्वत:च इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यांनी मंगळवारी राजघाटावर जाऊ न महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांना आदरांजलीही वाहिली.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन