शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीची 'अमेझिंग' संधी; अ‍ॅमेझॉन इंडियामध्ये 1300 जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 13:47 IST

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे टेन्शन लवकरच मिटणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय कंपनी 'अ‍ॅमेझॉन'मध्ये नोकरीच्या संधी लवकरच उपलब्ध होणार आहेत. बेरोजगारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

ठळक मुद्देअ‍ॅमेझॉनकडून भारतात नोकरीसाठी 13,000 जागाबेरोजगारांसाठी आनंदाची बातमीअ‍ॅमेझॉन कंपनी कौशल्यवान व्यक्तींच्या शोधात

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे टेन्शन लवकरच मिटणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय कंपनी 'अ‍ॅमेझॉन'मध्ये उत्तम नोकरीच्या संधी लवकरच उपलब्ध होणार आहेत. बेरोजगारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 'अ‍ॅमेझॉन' कंपनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या विचारात आहे. पण, केंद्र सरकारच्या अलीकडील कडक धोरणांमुळे 'अ‍ॅमेझॉन'सहीत अन्य खासगी कंपन्यांच्या ई-कॉमर्स व्यवसायाला भारतात मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 

नोकरीसंदर्भात कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनीनं भारतात सर्वाधिक 13,000 जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. चीनच्या तुलनेत भारतामध्ये नोकरीच्या संधी कमीत कमी तीनपटीनं अधिक प्रमाणात आहेत. आशिया- पॅसिफिक प्रादेशिक क्षेत्राबाहेर केवळ जर्मनीमध्ये भारताप्रमाणे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.  

कुठे आणि किती प्रमाणात आहेत जॉब?अ‍ॅमेझॉन कंपनीने टेक्नॉलॉजीसह निरनिराळ्या पदांसाठी भारतात जवळपास 1,300 नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये अधिकतर बंगळुरू, हैदराबाद आणि चैन्नईमधील प्रतिभाशाली व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, चीनमध्ये 467,  जपानमध्ये 381 , ऑस्ट्रेलिया 250 तर  सिंगापूरमध्ये 174 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. दरम्यान, 2018च्या अखेरपर्यंत अ‍ॅमेझॉनने भारतात 60,000 पदांची भरती केली होती.  

अ‍ॅमेझॉनचा भारतातील वाढता व्यवसायअ‍ॅमेझॉन कंपनी भारतात आपला व्यवसाय वाढवत आहे. ई-कॉमर्स आणि क्लाउड बिझनेसव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉन कंपनी पेमेंट्स, कंटेट (प्राईम व्हिडीओ), व्हॉईस असिस्टन्ट (अलेक्सा), फूड रिटेल आणि कस्टमर सपोर्ट क्षेत्रांतही आपले नशीब आजमावत आहे. 

अ‍ॅमेझॉन घेत आहे कौशल्यवान व्यक्तींचा शोधअ‍ॅमेझॉन कंपनीच्या एका महिला प्रवक्त्यानं सांगितले की, भारतातील कौशल्यवान व्यक्तींचा 'अ‍ॅमेझॉन'कडून शोध घेतला जात आहे. भारतात असलेल्या 'अ‍ॅमेझॉन'च्या टीमकडून व्यवसायातील आव्हानांवर काम केले जात आहे. ही टीम समस्यांवर उपाय शोधण्याचं काम करते. जेणेकरुन भारतासहीत जगभरात अ‍ॅमेझॉनचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. पुढे त्यांनी असेही सांगितले की, वाढत्या व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी हुशार आणि कौशल्यवान व्यक्तींचा शोध घेत आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सल्पाय चेन, कन्टेंट डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स, स्टुडिओ यांसहीत अन्य निरनिराळ्या क्षेत्रांत अ‍ॅमेझॉनकडून भारतातील तरुणवर्गासाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनIndiaभारतjobनोकरी