शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉनने भारतात गुंतवणुकीची घोषणा करून उपकार नाही केले; पीयूष गोयल भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 21:20 IST

अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी भारतात 1 अब्ज डॉलर (7000 कोटी रुपये) गुंतविण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी भारतात 1 अब्ज डॉलर (7000 कोटी रुपये) गुंतविण्याची घोषणा केली आहे. यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी अ‍ॅमेझॉनला सुनावले आहे. 

अ‍ॅमेझॉनने भारतामध्ये गुंतवणुकीची घोषणा करून काही उपकार नाही केलेत. ई-कॉमर्सच्या गुंतवणूकदारांनी देशाच्या कायद्यांमधील कमतरतेचा फायदा उठविता नये. अ‍ॅमेझॉनविरोधात ई-कॉमर्सच्या नियमांच्या उल्लंघनप्रकरणी चौकशी सुरू आहे. 

गोयल यांनी अशावेळी ट्वीट केले आहे, जेव्हा जेफ बेजोस महत्वाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. अनेकदा मी सांगितले आहे की भारतीय नागरिक आणि सर्व गुंतवणूकदारांनी कायद्याचे पालन करावे. भलेही त्यांनी त्यांच्या व्य़ापारामध्ये एक अब्ज डॉलर टाकले असतील आणि त्यांना तेवढेच नुकसान झाले असेल. याची भरपाई त्यांनाच करावी लागेल. यामुळे ते जर भारतात गुंतवणूक करत असतील तर ते देशावर उपकार करत नसल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. 

तसेच सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्याची मंजुरी दिली आहे. मात्र जोपर्यंत निय़मांमध्ये राहून ते काम करतात तोपर्य़ंतच त्यांचे स्वागत करण्यात येईल असा इशाराही गोयल यांनी दिला आहे. 

भारतीय प्रतिस्पर्धा आयोग अ‍ॅमेझॉनविरोधात एफडीआय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करत आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अ‍ॅमेझ़ॉनविरोधात तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, फेस्टिव्ह सिझनमध्ये मोठी सूट देऊन नियमांचे उल्लंघन केले आहे. याच प्रकरणात फ्लिपकार्ट विरोधातही चौकशी सुरू आहे.

 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनpiyush goyalपीयुष गोयलFlipkartफ्लिपकार्ट