शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट; सैन्य अलर्ट मोडवर, अँटी ड्रोन अटॅक सिस्टीम अॅक्टीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 18:43 IST

Amarnath Yatra 2022: भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाच्या 350 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात विविध विभागांचे 40 हजारांहून अधिक जवान तैनात असतील.

Amarnath Yatra 2022: काल राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिंप्याची दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर देशात दहशतवादी कारवायांबाबत सरकार अलर्ट मोडवर आहे. यातच, यंदाच्या अमरनाथ यात्रेवरही संकट येऊ शकते, असे इनपूट मिळाल्याची माहिती आहे. 3,888 मीटर उंचीवर असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेला 'स्टिकी' बॉम्बचा धोका असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा झाली नव्हती. तसेच, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरही ही पहिलीच यात्रा आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये झालेल्या टेलरच्या हत्येमुळे देशात दहशतवादी धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत अमरनाथ यात्रेबाबत पोलीस प्रशासनही हाय अलर्टवर आले आहे. काश्मीरचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, स्टिकी बॉम्ब आणि ड्रोन हल्ले, यंदाचे सर्वात मोठे धोके आहेत. परंतु या दोन्हीपासून बचाव करण्यासाठी एक संपूर्ण योजना देखील तयार आहे.

धोक्यांना तोंड देण्याची तयारी 30 जून ते 11 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. ही यात्रा दोन वर्षांनी होत असल्याने जुना विक्रम मोडत यात्रेकरूंची संख्या 8 लाखांवर पोहोचू शकते. अमरनाथ यात्रेत पहिल्यांदाच केंद्राच्या 350 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) 40 हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.

त्रिस्तरीय सुरक्षा, पर्वत आणि जंगलामध्ये सैन्यआयजी कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रवास तीन स्तरांच्या सुरक्षेत असेल. CAPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी रोड ओपनिंग पार्टी (ROP) साठी संयुक्त तयारी केली आहे. उंच टेकड्या आणि घनदाट जंगले सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी लष्कराची आहे. सर्व लिंक रोड देखील पूर्णपणे सुरक्षित असतील. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे या प्रवासावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी शार्प शूटर आणि स्नायपरही तैनात करण्यात आले आहेत. NDRF, UTSDRF आणि MRT देखील महत्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. प्रवासात सामील होणारी वाहने आणि प्रवाशांना RFID टॅग देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाच्या 350 कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राIndian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दलJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला