नवी दिल्ली : कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वॅबला गुळण्या केलेले पाणी हा पर्याय ठरू शकतो, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे. त्यासाठी नुकतीच एक पाहणीही करण्यात आली होती.कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेणे किंवा गुळण्या केलेल्या पाण्याचा नमुना गोळा करणे यापैकी कोणत्या पर्यायाला लोक अधिक पसंती देतात याचाही अभ्यास आयसीएमआरने केला. एम्समधील ५० कोरोना रुग्णांचा या पाहणीत समावेश करण्यात आला होता. हे रुग्ण समाजातल्या विभिन्न स्तरांतील होते. स्वॅब घ्यावा की एखाद्या व्यक्तीने गुळण्या केलेले पाणी नमुना म्हणून घ्यावे याबद्दल या व्यक्तींना त्यांची मते विचारण्यात आली. ही पाहणी मे व जून महिन्यात करण्यात आली.
गुळण्याच्या पाण्याचा नमुना स्वॅबला पर्याय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:36 IST