शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या टीमबरोबरच जे.पी. नड्डा करणार काम; लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे नव्या टीमचा निर्णय लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 05:45 IST

नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ मागील महिन्यात १७ जानेवारी रोजी वाढविण्याची घोषणा करण्यात आली,

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नवी टीम तयार करणार नाहीत. ते जुन्या टीमबरोबरच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काम करणार आहेत. अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका व २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे नवी टीम तयार करण्याचा निर्णय टाळण्यात आला आहे.

नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ मागील महिन्यात १७ जानेवारी रोजी वाढविण्याची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून ते नव्या कार्यकाळासाठी नवीन टीमचे गठण करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु ते जुन्या टीमबरोबरच काम करतील, हे आता निश्चित करण्यात आले आहे. हीच टीम २०२३ मधील सर्व विधानसभा निवडणुका व २०२४ मधील लोकसभा निवडणुकांची रणनीती ठरवील.

निवडणुकांबाबत आज चर्चारविवारी भाजपच्या मुख्यालयात जे. पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. त्या कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या सहा राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १६० जागांवर भाजपच्या स्थितीबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. 

जी-२० वर भाजपचे कार्यक्रम जी-२० संमेलनाची तयारी देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भाजप जी-२० देशांचे कार्यक्रम देशभरात घेऊन जाण्यासाठी कार्यक्रम तयार करीत आहे. बूथ, मंडळ, जिल्ह्यांपासून राज्यांच्या राजधानींमध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय सरचिटणीसांबरोबर ऐकणार मन की बात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा रविवारी आपल्या सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांबरोबर भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर ऐकणार आहेत.

टॅग्स :BJPभाजपा