शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: "१८ वर्षांपुढील सर्वांच्याच लसीकरणाला परवानगी द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:54 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली असून, बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस देण्याला परवानगी द्यावी, अशा आशयाची मागणी करणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. सद्यस्थितीत ४५ वर्षांपुढील सगळ्यांना लस दिली जात आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा झपाटा पाहता लसीकरण मोहिमेला वेग देणे गरजेचे असून, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात यावी. तसेच खासगी क्षेत्रातील दवाखान्यांनाही लसीकरणाची परवानगी दिली जावी, अशी आम्ही या पत्राद्वारे मागणी करीत आहोत, असे आयएमएने पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्वांना लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करावे, असेही या पत्रात सुचविण्यात आले आहे. सिनेमा, कला, क्रीडा, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात तातडीने कठोर निर्बंध लादून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखावा व संक्रमण साखळी तोडावी, त्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असेही पत्रात आयएमएने म्हटले आहे.ऑगस्टपर्यंत लसीचा प्रभाव दिसून येणारएम्सचे माजी संचालक डॉ. एम. सी. मिश्रा यांनी सांगितले की, देशामध्ये आतापर्यंत सुमारे सात कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये लसीचे दोन डोस खूपच कमी लोकांना देण्यात आले आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, देशात सद्य:स्थितीत प्रत्येक १०० लोकांमधील सुमारे पाच जणांनाच कोरोनावरील लस देण्यात आली आहे.हल्लीच अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार मास्कच्या वापरामुळे फैलाव झालेल्या भागात संसर्गाच्या दरात वेगाने घट होत असल्याचे दिसून आले आहे. ज्या ठिकाणी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांकडून मास्कचा वापर करण्यात आला नाही. त्या ठिकाणी एक लाख लोकांमागे ६४३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी