शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खासगीत मद्यपान करण्याची परवानगी द्या, हायकोर्टात दाखल केली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 16:04 IST

दारूबंदीचा कायदा हा खासगीपणाचे आणि समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे सांगत एका व्यक्तीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

 अहमदाबाद -  दारूबंदीचा कायदा हा खासगीपणाचे आणि समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे सांगत एका व्यक्तीने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. मात्र या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी आम्ही गुजरात सरकारची दारुबंदीच्या धोरणाबाबतची बाजू ऐकून घेणार आहोत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गुजरातमध्ये दारुबंदीचा कायदा लागू आहे. मात्र याचिकाकर्त्याने दारुबंदीला विरोध केला असून, हा नियम खाजगीपणाचे उल्लंघन करतो. तसेच समानता आणि जगण्याच्या अधिकाऱाचे हनन करतो, असा आरोप याचिकाकर्त्यांने केला आहे. याचिकाकर्ते राजीव पटेल यांनी दारुबंदीबाबतच्या गुजरात निषेध अधिनियम आणि मुंबई निषेध अधिनियमामधील अनेक कलमांना आव्हान दिले आहे. गुजरातमध्ये कुठल्याही व्यक्तीला खाजगी ठिकाणीसुद्धा दारू पिण्यास आणि घेऊन जाण्यास बंदी आहे. खासगी ठिकाणी दारू पिणे ही बाब व्यक्तिगत आहे. त्यामुळे अन्य कुणाला नुकसान होत नाही किंवा सामाजिक सुरक्षाही धोक्यात येत नाही, असा दावा राजीव पटेल यांनी याबाबत जॉन स्टुअर्ट मिल यांचा हवाला देऊन केला आहे. तसेच दारुबंधी कायद्यातील कलम १२, १३, १४-१बी, ६५ आणि ६६ हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गुजरात सरकारच्या दारुबंदी कायद्याचे उलटे परिणाम होत असल्याचा दावाही पटेल यांनी केला आहे. आता हायकोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. मात्र या याचिकेवर सुनावणी करताना सरकारची बाजूही ऐकून घेण्यात येईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीGujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालय