बलात्कारप्रकरणी तिघांना अंतरिम जामीन मंजूर
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
सोलापूर : संगनमत करून व कट रचून तरुणीस पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी रवींद्र यल्लप्पा गायकवाड, नम्रता रवींद्र गायकवाड आणि रार्जशी प्रमोद गायकवाड या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
बलात्कारप्रकरणी तिघांना अंतरिम जामीन मंजूर
सोलापूर : संगनमत करून व कट रचून तरुणीस पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी रवींद्र यल्लप्पा गायकवाड, नम्रता रवींद्र गायकवाड आणि रार्जशी प्रमोद गायकवाड या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पवन रवींद्र गायकवाड याने 19 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी 2012 मध्ये स्वत:च्या घरी नेऊन बलात्कार केला. यासाठी पवन यास वरील तीन आरोपींसह त्याचा भाऊ प्रफुल्ल रवींद्र गायकवाड यांनी कट रचून व संगनमत करून सहकार्य केले. मागील 3 वर्षांपासून त्या तरुणीस धमक्या देऊन वेळोवेळी, वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची फिर्याद पीडित तरुणीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. पीडित तरुणी ही आरोपी पवनची पत्नी असल्याचे कागदोपत्री पुराव्यासह न्यायालयाच्या निदर्शनास आणून पीडित पत्नीस लग्नाचे आमिष दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा गौप्यस्फोट आरोपींचे वकील अँड. अरविंद अंदोरे, अँड. समीर माशाळे यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करून तिन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. पुढील सुनावणी दि. 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणी आरोपींतर्फे अँड. अरविंद अंदोरे, अँड. समीर माशाळे, अँड. र्शीकृष्ण कुलकर्णी हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)